Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहलच्या 100 एकदिवसीय विकेट्स पूर्ण, शंभरावी विकेट ठरली खास, रोहित विराटने मिळून घेतला रिव्ह्यू
Yuzvendra Chahal : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात युझवेंद्र चहलने अप्रतिम कामगिरी करत चार विकेट्स टीपल्या आहेत.
Yuzvendra Chahal : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु असून पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 176 धावांत सर्वबाद केलं आहे. ज्यामुळे विजयासाठी भारताला 177 धावांची गरज आहे. यावेळी सामन्यात युझवेंद्र चहल याने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 विकेट्स टीपल्या. ज्यामुळे त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याची शंभरावी विकेट्स काहीशी खास ठरली आहे. कारण वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन याला चहलने पायचीत केलं असताना आधी पंचानी नाबाद दिलं पण टीम इंडियाने रिव्ह्यू घेत पंचांना निर्णय बदलायला लावला. दरम्यान हा रिव्ह्यूय घेताना रोहित, विराट, पंत अशा साऱ्यांनी आपआपसांत चर्चा करत रिव्ह्यू घेतला. दरम्यान या चर्चेचा सर्व ऑडीओ स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झाला असून बीसीसीआयने याबद्दलचं ट्वीट देखील केलं आहे.
वेस्ट इंडिजची फलंदाजी
सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजांनी कसून गोलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना हात खोलण्याची संधी दिलीच नाही. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक दावा जेसन होल्डर (57) याने केल्या असून कर्णधार पोलार्डतर शून्यावर बाद झाला. ज्यामुळे संघ 43.5 ओव्हरमध्ये 175 धावांच करु शकला आहे. भारताकडून युझवेंद्र चहलने 4, सुंदरने 3, प्रसिधने 2 आणि सिराजने 1 विकेट घेतली आहे.
चहलच्या 100 विकेट्स पूर्ण
आजच्या सामन्यात युझवेंद्र चहलने 9.5 ओव्हर टाकत 49 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने या 4 विकेट्सच्या मदतीने एकदिवसीय क्रिकेटमधील 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्याने एक अनोखं शतक पूर्ण केलं आहे. चहलने 60 सामन्यांतील 59 डावांत गोलंदाजी करत 102 विकेट्स पूर्ण केल्या आहे. यावेळी चहलने एका सामन्यात 42 धावां देत 6 विकेट्स टीपल्या आहेत. ही त्याची बेस्ट बोलिंग आहे. दरम्यान आजच्या गोलंदाजीमुळे संघाला मोठा फायदा झाला असून भारतीय संघात त्याचं स्थान यामुळे अधिक पक्क होण्यास मदत होणार आहे.
हे ही वाचा -
- ICC U19 World Cup 2022: भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव; BCCIकडून प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस! गांगुली, शाह म्हणाले...
- India vs West indies ODI : आजपासून भारत-वेस्ट इंडीज एकदिवसीय मालिकेला सुरूवात, के. एल. राहुलची पहिल्या वनडेतून माघार
- ICC U19 World Cup 2022: इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha