Yuzvendra Chahal-RJ Mahvash: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेदरम्यान (Champions Trophy 2025) भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि आरजे महवश (RJ Mahvash) दुबई क्रिकेट मैदानावर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. युझवेंद्र चहल आणि आरजे महवशला एकत्र पाहिल्यानंतर दोघंही एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. याचदरम्यान आरजे महवशचा एक जूना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आरजे महवश मुलींना कोणत्या प्रकारची मुलं आवडतात याबाबत बोलताना दिसत आहे. मुलींना बॉडीबिल्डरपेक्षा बारिक मुलंच जास्त आवडतात, असं महवश या व्हिडीओत म्हणतेय. प्रत्येक मुलीला बॉडीबिल्डरच हवा असं गरजेचं नाही. जी मुलं सोशल मीडियावर आपली बॉडी दाखवतात, तीच मुलं नेहमी वैयक्तिक मेसेज करून टिप्स मागतात. मुलींचीही आवड-निवड आता बदलली आहे, आरे महवशने सांगितले.
प्रिय बॉडीविना मुलं...तुमच्यासाठी आम्ही आहोत- आरेज महवश
डेटवर आता मुलीसुद्धा उकडलेली अंडी किंवा उकडलेल्या भाज्या ऑर्डर करत नाहीत तर मोमोजची प्लेट ऑर्डर करतात, असं आरजे महवश म्हणाली. प्रिय बॉडीविना मुलं...तुमच्यासाठी आम्ही आहोत. महवशचा हा व्हिडीओ आता चर्चेत आला असून ती युजवेंद्र चहलबद्दलच बोलत असल्याचं नेटकरी सांगत आहे. दरम्यान, आरजे महवशचा हा व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा आहे. दरम्यान, यापूर्वी देखील युझवेंद्र चहलचे तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण ती चहलची केवळ मैत्रीण असल्याचे मैहवशने सांगितले होते. आता त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.
युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचा घटस्फोट-
भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने 21 फेब्रुवारी रोजी वांद्र्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे वेगळे राहत असल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली. धनश्री आणि युजवेंद्र यांना न्यायाधीशांनी वेगळं होण्याची कारणं विचारल्यानंतर कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेककांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.
सकाळी 8 च्या बातम्या, VIDEO:
संबंधित बातमी:
मिस्ट्री गर्लसोबत बसलेल्या युझवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयचा एक सवाल; तिही खुदकन हसली, VIDEO