indian international cricketers : ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज सारखे अनेक संघ त्यांच्या टीममध्ये विदेशी खेळाडूंना संधी देताना दिसतात. आता तुम्ही विचाराल की विदेशी खेळाडू म्हणजे काय? तर असे खेळाडू ज्यांच्या जन्म दुसऱ्या देशात झालेला असतो. मात्र, ते तिसऱ्याच देशासाठी खेळताना दिसतात. क्रिकेट विश्वात असे अनेक खेळाडू आहेत, जे दुसऱ्या देशातील आंतरराष्ट्रीय टीमचा भाग बनले आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये (indian international cricketers ) देखील अशी परंपरा पाहायला मिळते. काही निवडक खेळाडू असे आहेत, ज्यांचा जन्म विदेशात झालाय, पण त्यांनी भारताशी दमदार कामगिरी केलीये.
1 . लाल सिंग (मलेशिया) मलेशियामध्ये जन्मलेले लाल सिंग हे पटियालाच्या महाराजांमुळे भारतीय कसोटी संघात खेळू शकले. 1932 मध्ये लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याचा भाग असलेले लाल सिंग हे त्यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू म्हणून ओळखले जात होते. त्या सामन्यात त्यांनी दिग्गज फ्रँक वूलीला सामन्याच्या सुरुवातीच्या धावबाद केले होते. त्याकाळी क्रिकेटमध्ये रन आऊट क्वचितच पाहायला मिळायचे.
2. अशोक गंडोत्रा (रिओ दि जानेरो, ब्राझील) ब्राझीलमध्ये जन्मलेले जगातील एकमेव कसोटी क्रिकेटपटू होते. त्यांनी 1969/70 मध्ये भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. गंडोत्रा यांचे कुटुंब दिल्लीत राहत होते, परंतु त्यांचे वडील ब्राझीलमध्ये असायचे. पण लहान वयातच ते भारतात आले आणि दिल्लीकडून क्रिकेट खेळू लागले. त्याच्या नावावर दोन सामन्यांमध्ये एकूण 54 धावा आहेत.
3. रॉबिन सिंग (त्रिनिदाद आणि टोबॅगो) रॉबिन सिंग हे मूळचे कॅरिबियन बेटांमधील त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील होते. तेथेच त्यांचा जन्म झाला होता. तेथील अंडर-19 संघासोबत खेळल्यानंतर रॉबिन सिंग उच्च शिक्षणासाठी भारतात आले. 1982 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी रॉबिन मद्रासला गेले. मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली. 1989 मध्ये जेव्हा त्याला भारतीय नागरिकत्व मिळाले. तेव्हा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड झाली.
4. सलीम दुर्रानी (कराची, पाकिस्तान) 'प्रिन्स' दुर्राणी हा एक अष्टपैलू खेळाडू होता, ज्याने इंग्लंडविरुद्ध भारताच्या पहिल्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानातील सर्वात मोठं शहर असलेल्या कराचीमध्ये जन्मलेला सलीम हा अफगाणिस्तानातील काबुलचा आहे. याबाबतचे दावे त्याने फेटाळूनही लावले होते. सलीमने 1960 ते 1973 दरम्यान भारतासाठी 29 कसोटी खेळल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या
RJ Mahvash : आता शुभमन गिलसोबत महवाशचा व्हिडीओ, युजर्स म्हणतात युजवेंद्र चहल भाईसोबत धोका?
