Yuzvendra Chahal Champions Trophy 2025 Ind vs NZ Final: 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे (Champions Trophy 2025) जेतेपद पटकावले. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला आणि तिसरे चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंडचा हा अंतिम सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज मैदानात उपस्थित होते. 

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युझवेंद्र चहल देखील (Yuzvendra Chahal) सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होता. पण यावेळी युझवेंद्र चहलसोबत सामना पाहण्यासाठी आलेल्या मिस्ट्री गर्लची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. युझवेंद्र चहलसोबत दिसणारी मुलगी ही आरजे मैहवश आहे. यापूर्वी देखील युझवेंद्र चहलचे तिच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण ती चहलची केवळ मैत्रीण असल्याचे मैहवशने सांगितले होते. आता त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

मिस्ट्री गर्लसोबत बसलेल्या युझवेंद्र चहलला विवेक ओबेरॉयचा एक सवाल-

युझवेंद्र चहल आणि आरजे मैहवश यांच्या पुढे बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय बसला होता. न्यूझीलंडने भारताना धावांचं लक्ष्य दिल्यानंतर विवेक ओबेरॉयने युझवेंद्र चहलला भारत जिंकणार का असे विचारले. यावर नक्कीच आरामात जिंकणार, असं युझवेंद्र चहल म्हणाला. यानंतर आरजे मैहवशदेखील हसू लागली. 

युझवेंद्र चहल अन् धनश्री वर्माचा घटस्फोट-

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Varma) यांचा घटस्फोट (Divorce) झाला आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने 21 फेब्रुवारी रोजी वांद्र्यातील फॅमिली कोर्टात घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे वेगळे राहत असल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली. धनश्री आणि युजवेंद्र यांना न्यायाधीशांनी वेगळं होण्याची कारणं विचारल्यानंतर कम्पॅटिबिलिटी संबंधित मुद्यांमुळे एकमेककांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.

संबंधित बातमी:

Champions Trophy 2025 Virat Kohli: मेरा भारत महान! एकीकडे जंगी सेलीब्रेशन, दुसरीकडे मायेचा हात; विराट कोहली तिच्याजवळ गेला अन्..., PHOTO