एक्स्प्लोर

WTC Points Table : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच कसोटी भारताचा एकतर्फी विजय, WTC गुणतालिकेत झाला मोठा फायदा

IND vs AUS : नागपूर कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांच्या फरकाने विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या गुणतालिकेतही चांगली झेप घेतली आहे. 

WTC Points table : ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर कसोटी सामन्यात (IND vs AUS 1st Test) एक डाव आणि 132 धावांनी जिंकून भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC) च्या गुणतालिकेत आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियन संघ 70.83 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर भारतीय संघाला आता 61.66 गुणांची टक्केवारी मिळाली आहे. या विजयासह, भारतीय संघाने आता ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या या WTC फायनलच्या सामन्यात आपलं स्थान निश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक यशस्वी पाऊल टाकलं आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या यंदाच्या आवृत्तीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला ही मालिका किमान 3-1 अशा फरकाने जिंकावी लागेल. यासह, भारतीय संघाची विजयी टक्केवारी 61.92 पर्यंत पोहोचू शकते. ज्यामुळे मार्च महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंका या 2 सामन्यांची कसोटी मालिकेवर भारताला अवंलंबून राहावे लागणार नाही. दुसरीकडे, भारतीय संघाने आता ही मालिका 3-0 किंवा 4-0 ने जिंकली तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानी पोहचेल.

आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप 2022-23 गुणतालिका:
 
संघ विजय पराभव अनिर्णीत एकूण गुण विजयी टक्केवारी
1. ऑस्ट्रेलिया 10 2 4 136 70.83
2. भारत 9 4 2 111 61.67
3.श्रीलंका 5 4 1 64 53.33
4. दक्षिण आफ्रीका 6 6 1 76 48.72
5. इंग्लंड 10 8 4 124 46.97
6. वेस्ट इंडीज 4 5 2 54 40.91
7. पाकिस्तान 4 6 4 64 38.10
8. न्यूझीलंड 2 6 3 36 27.27
9. बांगलादेश 1 1 10 16 11.11

भारताचा दमदार विजय

भारतानं आजचा हा सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात सुरुवातीपासून भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ज्यात ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारतानं पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावातच 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली पण अखेर सामना भारतानं मोठ्या फरकाने जिंकला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Team India (@indiancricketteam)

 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
AUS vs BAN 2nd Test : W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
W,W,W,W,W,W... पहिल्याच चेंडूपासून कहर! स्टार्कच्या वादळात बांगलादेश उद्ध्वस्त, 64 धावांत संपूर्ण संघाचा खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा धडकी भरवणारा पलटवार, VIDEO
WTC Points Table : पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला
पाकिस्तानची अशी दाणादाण कधी पाहिली नसेल! ना फलंदाजी जमली, ना गोलंदाजी...; इंग्लंडसमोर फक्त अन् फक्त लाचार, आता WTC पॉइंट्स टेबलमध्ये तळाला

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Embed widget