एक्स्प्लोर

WTC Points Table : ऑस्ट्रेलियाचा महाविजय अन् WTC पॉइंट्स टेबलच्या रेसमध्ये टॉप! इंग्लंडची पडझड, टीम इंडिया कोणत्या स्थानावर?

ICC WTC Points Table Updated Marathi News : ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडवर 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.

ICC WTC Points Table Updated after AUS vs ENG 1st Test : ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडवर 8 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. पर्थच्या मैदानावर फक्त दोन दिवसांत कंगारूंनी इंग्लिश संघाला गुंडाळून टाकलं. इंग्लंडने दिलेलं 205 धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाने अगदी तुफानी शैलीत पार केलं. ट्रॅव्हिस हेडने वादळी खेळी खेळत इंग्लिश गोलंदाजांना धू-धू धुतले. या जबरदस्त विजयाचा फायदा ऑस्ट्रेलियाला WTC पॉइंट्स टेबलमध्येही मोठ्या प्रमाणात झाला असून इंग्लंडची स्थिती आणखीच बिकट झाली आहे. टीम इंडिया अजून चौथ्या स्थानी आहे. (Latest World Test Championship Table After First Ashes Test Ends in Two Days)

ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

पहिल्या कसोटीतील संस्मरणीय विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुणतालिकेत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे. कांगारूंनी या चक्रात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत. संघाचा विजयाची टक्केवारी 100 आहे. दुसरीकडे, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी 66.67 आहे. श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे. 54.17 टक्केवारीसह भारत टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे.

इंग्लंडची अडचण वाढली

दोन सामन्यांपैकी एका विजयासह पाकिस्तान WTC पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. दरम्यान, अ‍ॅशेस मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे, परंतु त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. इंग्लंडचा एकूण विजयाची टक्केवारी 36.11 आहे. बांगलादेश सातव्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज आठव्या स्थानावर आहे.

फक्त दोन दिवसांत काम तमाम!

पहिलाच कसोटी सामना आणि तोही दीड-दोन दिवसांत संपलेला. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि गोलंदाजीसमोर इंग्लंड पूर्णपणे फेल ठरली. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि जेक वेदराल्ड यांनी सलामी भागीदारी केली. वेदराल्ड 23 धावांवर बाद झाला, पण हेडनं इंग्लिश गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

ट्रॅव्हिस हेडने आधी 36 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, मग 69 चेंडूंमध्ये शतक ठोकले. एकूणच 83 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या. यादरम्यान, त्याने 16 चौकार आणि 4 गगनचुंबी षटकार मारले. इंग्लिश गोलंदाजी हेडसमोर पूर्णपणे हतबल झाली. त्याच वेळी नंबर तीनवर आलेल्या मार्नस लाबुशेननंही 49 चेंडूंमध्ये नाबाद 51 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.

हे ही वाचा -

Aus vs Eng 1st Test : दीड दिवसात कसोटी सामना संपला! पर्थची खेळपट्टी इंग्लंडसाठी ठरली कर्दनकाळ, ट्रॅव्हिस हेडची तुफानी खेळी, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

SMAT 2026 : वडिलांच्या निधनाचा धक्का, अंत्यसंस्कार उरकले अन् दुसऱ्याच दिवशी मॅच खेळण्याठी मुंबईत परतला, क्रिकेटपटूच्या धैर्याने विराट कोहलीची आठवण
वडिलांच्या निधनाचा धक्का, अंत्यसंस्कार उरकले अन् दुसऱ्याच दिवशी मॅच खेळण्याठी मुंबईत परतला, क्रिकेटपटूच्या धैर्याने विराट कोहलीची आठवण
Arjuna Awards 2025 Winners List : दिव्या देशमुख, विदित गुजरातीसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार; महाराष्ट्रातील खेळाडूंनी उंचावली मान, पाहा संपूर्ण यादी
दिव्या देशमुख, विदित गुजरातीसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार; महाराष्ट्रातील खेळाडूंनी उंचावली मान, पाहा संपूर्ण यादी
Team India : भारताचा डाव 89 धावांवर आटोपला, गौतम गंभीरनं फलंदाजांना झापलं, चौथ्या वनडेत पराभव होताच गंभीर भडकला
भारताचा डाव 89 धावांवर आटोपला, चौथ्या वनडेत पराभव होताच गौतम गंभीर फलंदाजांवर भडकला
IND vs NZ 4th ODI : रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं!
रोहित, विराटसह जवळपास अर्धा संघ शून्यावर बाद, तिघांची दुहेरी धावसंख्या, 7 एक्स्ट्रा धावांनी लाज राखली, टीम इंडियाला न्यूझीलंडने सळो की पळो करुन सोडलं!

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Bus Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसचा भीषण अपघात; पुलाचा कठडा तोडून बस खाली कोसळली, हादरवणारे 5 फोटो
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Embed widget