WTC पॉइंट टेबलमध्ये पुन्हा उलथापालथ! तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडिया टॉप-2 मध्ये मारणार एन्ट्री, जाणून घ्या नवीन समीकरण काय?
ॲडलेड कसोटी हरल्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलच्या टॉप-2 मधून टीम इंडिया बाहेर गेली आहे.
WTC Points Table 2025 : ॲडलेड कसोटी हरल्यानंतर डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलच्या टॉप-2 मधून टीम इंडिया बाहेर गेली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारताला पुन्हा एकदा टॉप-2 मध्ये स्थान मिळू शकते. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात गकबेरहा येथे दुसरी कसोटी सुरू आहे. या सामन्यात यजमान संघाला पराभवाचा सामना करावा लागला तर भारत पुन्हा टॉप-2 मध्ये प्रवेश करेल.
पहिला सामना गमावल्यानंतर श्रीलंका संघाने दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेकडून संघाला 348 धावांचे लक्ष्य मिळाले असून त्याला प्रत्युत्तर म्हणून चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 गडी गमावून 205 धावा केल्या आहेत. संघाला विजयासाठी अजून 143 धावांची गरज आहे, तर त्याच्या पाच विकेट शिल्लक आहेत. हे संपूर्ण समीकरण पाहता हा सामना खूपच रोमांचक झाला आहे.
सध्याच्या डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलवर नजर टाकल्यास ऑस्ट्रेलिया 60.71 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका 59.26 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धची दुसरी कसोटी गमावली तर त्यांच्या टक्केवारी 53.33 होईल. अशा स्थितीत टीम इंडियाला पुन्हा टॉप-2 मध्ये स्थान मिळेल. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर जाईल. या विजयाचा फायदा श्रीलंकेला होणार असून ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर संघ तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेच्या खात्यात 54.54 टक्के गुण जमा होतील.
श्रीलंकेपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेलाही पाकिस्तानविरुद्ध मायदेशात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. जर पाकिस्तानी संघ दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील एका सामन्यातही पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर त्याचा थेट फायदा भारताला होईल. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असेल.
Australia have recaptured the top spot in the #WTC25 Standings after a big win in Adelaide.
— ICC (@ICC) December 8, 2024
Read more ➡️ https://t.co/m33dD6AHN2 pic.twitter.com/sr77uCiuS5
डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आता तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा पराभव करायचा आहे. घरच्या मैदानावर कांगारूंचा संघ बलाढय़ असल्यामुळे संघासाठी हे काम सोपे जाणार नाही. दोन सामने संपल्यानंतर दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाने मालिकेत आणखी एक सामना गमावला तर त्याच्या अडचणी वाढतील. पण श्रीलंका आणि पाकिस्तानी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर भारतीय संघ फायनल खेळू शकतो.
हे ही वाचा -
Rohit Sharma : कॅप्टन रोहितला मिळणार नारळ? अचंबित करणारी आकडेवारी आली समोर; BCCI लाही आलं टेन्शन!