ICC WTC Points Table : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजयानंतर श्रीलंकेला WTC गुणतालिकेत मोठा फायदा, थेट तिसऱ्या स्थानावर झेप
World Test Championship : ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या कसोटीमध्ये श्रीलंकेने एक डाव आणि 39 धावांनी ऑस्ट्रेलियाला मात देत मालिका 1-1 ने अनिर्णित केली आहे.
![ICC WTC Points Table : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजयानंतर श्रीलंकेला WTC गुणतालिकेत मोठा फायदा, थेट तिसऱ्या स्थानावर झेप World Test Championship Table Team Standing After SL vs AUS Test Sri Lanka rise to 3rd Australia slip off top spot ICC WTC Points Table : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार विजयानंतर श्रीलंकेला WTC गुणतालिकेत मोठा फायदा, थेट तिसऱ्या स्थानावर झेप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/11/b2aceaaa54b366a855942a0dd98eaa981657558387_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WTC Points Table : कसोटी क्रिकेटचा विश्वचषक म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप कोणते दोन संघ यंदा खेळणार, यासाठी वर्षभर चालणाऱ्या कसोटी सामन्यांची गुणतालिका महत्त्वाची असून या लिस्टमध्ये नुकतीच श्रीलंकेनं झेप घेतली आहे. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाला दिलेल्या एका मोठ्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचली असून ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर आली आहे. विजय टक्केवारीत झालेल्या बदलामुळे गुणतालिकेत हे बदल झाले आहेत. सध्या गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका 71.43 टक्क्यांनी पहिल्या तर ऑस्ट्रेलिया 70.00 टक्क्यांनी दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय संघ पाचव्या स्थानावर
काही दिवसांपूर्वीच भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेला कसोटी सामना अनिर्णित सुटला. या सामन्यापूर्वी भारताची विजयाची टक्केवारी 58.33 टक्के इतही होती. पण या पराभवामुळे ही टक्केवारी कमी झाली. आता भारत थेट पाचव्या स्थानावर गेला आहे. भारताची विजयी टक्केवारी 52.08 इतकी झाली आहे. यामुळे आता भारताचं अंतिम सामन्यात पोहोचणं अजून अवघड झालं आहे. आता भारत बांग्लादेशविरुद्ध दोन तर ऑस्ट्रेलियाविरुद्घ 4 कसोटी सामने खेळणार आहे.
अशी आहे WTC गुणतालिका
टीम |
विजयी टक्केवारी |
गुण |
विजय |
पराभव |
अनिर्णित |
NR |
दक्षिण आफ्रीका |
71.43 |
60 |
5 |
2 |
0 |
0 |
ऑस्ट्रेलिया |
70.00 |
54 |
6 |
1 |
3 |
0 |
श्रीलंका |
54.17 |
52 |
4 |
3 |
1 |
0 |
पाकिस्तान |
52.38 |
44 |
3 |
2 |
2 |
0 |
भारत |
52.08 |
75 |
6 |
4 |
2 |
0 |
वेस्ट इंडीज |
50 |
54 |
4 |
3 |
2 |
0 |
इंग्लंड |
33.33 |
64 |
5 |
7 |
4 |
0 |
न्यूझीलंड |
25.93 |
28 |
2 |
6 |
1 |
0 |
बांग्लादेश |
13.33 |
16 |
1 |
8 |
1 |
0 |
हे देखील वाचा-
- ICC : यंदाचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जॉनी बेअरस्टोला, जो रुटसह डॅरी मिचेलला मात देत मिळवला मान
- PCB : क्रिकेट बोर्डाकडून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यामुळे भडकला पाकिस्तानी ऑलराउंडर, म्हणाला...
- India vs Rest of World : भारतीय क्रिकेटपटूंचा सामना जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्सशी, स्वांतत्र्यदिनानिमित्त रंगणार खास सामना, सरकारची बीसीसीआयला मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)