(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत आणि इंग्लंडमध्ये वॉर्म-अप सामन्यात लढत, फुकटात पाहा सामना
India vs England Live Streaming And Telecast : वनडे वर्ल्ड कप 2023 आधी वॉर्म-अप सामन्याला सुरुवात झाली आहे.
India vs England Live Streaming And Telecast : वनडे वर्ल्ड कप 2023 आधी वॉर्म-अप सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला नमवलं होतं. आज यजमान भारतीय संघ गतविजेत्या इंग्लंडशी भिडणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वॉर्मअप सामना गुवाहटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. वॉर्मअप सामन्यात दोन्ही संघ ताकदीने मैदानात उतरेल. त्याशिवाय कमकुवत बाजूवर काम करण्याचा प्रयत्न करेल. वॉर्मअप सामना लाईव्ह पाहता येणार आहे. हा सामना कधी अन् कुठे पाहाल... याबाबत जाणून घेऊयात...
कधी आहे सामना ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वॉर्म-अप सामना आज, म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी, शनिवारी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कुठे होणार सामना ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वॉर्म-अप सामना गुवाहटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
टिव्हीवर कुठे पाहाल सामना ?
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये होणारा सराव सामना स्टार स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येणार आहे.
मोफत कुठे पाहल सामना ?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील वॉर्म-अप सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टारवर केले जाणार आहे. मोबाइल वापरकर्ते हा सामना मोफत पाहू शकतील.
भारत आणि इंग्लंड वनडे हेड टू हेड
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत 106 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचे पारडे जड मानले जातेय. टीम इंडियाने आतापर्यंत 57 वेळा विजय मिळवला आहे. तर इंग्लंडला 44 वेळा विजय मिळवता आला आहे. वॉर्मअप सामन्यात दोन्ही संघाची लढत पाहण्यासारखी असेल.
वर्ल्ड कपसाठी भारताचे स्क्वाड
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर
इंग्लंडचे स्क्वाड -
जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), जोस बटलर, टॉम कुरैन, लियाम डॉसन, लियाम प्लंकेट, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, जेम्स विंस, क्रिस वोक्स, मार्क वुड.
Any 15 players can be used in the Warm Up matches. A great practice for the entire squad before the main games! pic.twitter.com/Mrdt6JU8Qu
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 30, 2023