10 निश्चित, एका जागेवर प्रश्नचिन्ह.... फायनलमध्ये कशी असेल टीम इंडिया?
विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताची प्लेईंग 11 कशी असेल, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे. टीम इंडियाचे 10 खेळाडू निश्चित आहेत. पण एका जागेसाठी अद्याप प्रश्नचिन्ह असू शकते.
World Cup Final IND vs AUS : भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनी सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का? 1983, 2011 आणि आता 2023.... रोहित शर्माची फौज विश्वचषकावर भारताचं नाव तिसऱ्यांदा कोरणार का...? की, पॅट कमिन्स अँड कंपनी ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा विश्वचषक जिंकून देणार... या प्रश्नाचं उत्तर रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मिळणारय.. पण त्याआधी भारताच्या प्लेईंग 11 ची जोरदार चर्चा सुरु आहे. होय... विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताची प्लेईंग 11 कशी असेल, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु आहे. टीम इंडियाचे 10 खेळाडू निश्चित आहेत. पण एका जागेसाठी अद्याप प्रश्नचिन्ह असू शकते.
आघाडीचे फलंदाज निश्चित-
रोहित शर्मा आणि शुभमन गिल पुन्हा एकदा वेगवान सलामी देण्यास सज्ज आहे. मागील आठ डावात या दोन्ही फलंदाजांनी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. खासकरुन रोहित शर्मा वेगवान सुरुवात देतोय. तो दहा षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा आत्मविश्वास घालवतोय. त्यानंतर गिल आणि विराट कोहली आपले काम चोख बजावतात. आता फायनलमध्येही भारतीय फलंदाजीत तीच रणनिती घेऊन मैदानात उतरली. विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात शुभमन गिल नव्हता. पण त्या सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नव्हते. त्या सामन्याचा बदला रोहित घेण्यास सज्ज झालाय. चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहलीने शानदार 85 धावांची खेळी केली होती. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुभवाला गिल याची साथ असेल. गिल आयपीएलमध्ये याच मैदानावर धावांचा पाऊस पाडतो, त्यामुळे भारताच्या फलंदाजाची मदार याच तिघांवर असेल.
मधल्या फळीतही तेच -
श्रेयस अय्यरची सुरुवात खराब झाली. पण त्यानंतर त्याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यानंतर अय्यरने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. मागील दोन सामन्यात त्याने शतकी खेळी केली आहे. तेही विस्फोटकपणे... त्याने आतापर्यंत 24 षटकार मारले आहेत. अय्यरने चौथ्या क्रमांकाला न्याय दिला. तो फायनलमध्येही तो दमखम दाखवण्यास सज्ज आहे. केएल राहुलही लयीत आहे. तो आपला रोल फरफेक्ट पार पाडतोय. विकेटच्या मागे तर तो सरस आहेच. पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा तेव्हा तो फलंदाजीतही योगदान देतोय. त्याशिवाय फिनिशिंगही जबारट करतोय.
आघाडीचे पाच फलंदाज फिक्स -
रोहित शर्मा
शुभमन गिल
विराट कोहली
श्रेयस अय्यर
केएल राहुल
लोअर मिडल ऑर्डर -
रविंद्र जाडेजा आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर लोअर मिडल ऑर्डरची जबाबदारी आहे. रविंद्र जाडेजा अष्टपैलूची भूमिका सक्षमपणे पार पाडत आहे. पण सूर्याला अद्याप हवा तसा वेळ मिळाला नाहीच... पण मिळालेल्या संधीचे सोनं त्याला करता आले नाही. इंग्लंडविरोधात त्याने केलेली खेळी शानदार होती. पण इतर सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. सूर्याकडून टीम इंडियाला टी20 स्टाईल फिनिशिंग हवी आहे. त्याला सूर्या अद्याप खरा उतरलेला नाही. पण फायनलमध्ये सूर्या चौफेर फटकेबाजी करण्यास तयार आहे.
सूर्यकुमार यादव
रविंद्र जाडेजा
सिराज की अश्विन -
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी भन्नाट फॉर्मात आहे. बुमराह सुरुवातीला धावा रोखतोच... त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण होते. त्यामध्ये ते विकेट फेकतात. शामीने दर यंदाच्या विश्वचषकात कहरच केलाय. त्याच्यापुढे अनेक दिग्गजांनी नांगी टाकली आहे. त्यामुळे बुमराह आणि शामी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कापून काढण्यास तयार आहेत. मोहम्मद सिराज की अश्विन दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? याबाबत सस्पेन्स कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विनचा रेकॉर्ड चांगलाय. अश्विन समोर दिसताच वॉर्नर आणि स्मिथ यांची दांडी गुल होते. अश्विनपुढे ऑस्ट्रेलियाचे अनेक फलंदाज चाचपडतात. त्यामुळे सिराजच्या जागी अश्विन खेळणार का? याबाबत चर्चा सुरु आहे. खेळपट्टी जर फिरकीला मदत करणारी असेल तर अश्विनला संघात स्थान मिळू शकते. कुलदीप यादव फिरकीची धुरा यशस्वी संभाळेल.
भारताची संभाव्य प्लेईंग ११ -
रोहित शर्मा
शुभमन गिल
विराट कोहली
श्रेयस अय्यर
केएल राहुल
सूर्यकुमार यादव
रविंद्र जाडेजा
जसप्रीत बुमराह
मोहम्मद शामी
मोहम्मद सिराज/अश्विन
कुलदीप यादव