विराट कोहलीकडे तीन महारेकॉर्ड करण्याची संधी, विश्वचषकात साधणार का डाव?
World Cup : यंदाच्या विश्वचषकात रनमशीन विराट कोहलीकडून (Virat Kohli) शानदार कामगिरीची भारतीय क्रिकेट (Team India) चाहत्यांना अपेक्षा आहे.
Virat Kohli ICC Cricket World Cup : यंदाच्या विश्वचषकात रनमशीन विराट कोहलीकडून (Virat Kohli) शानदार कामगिरीची भारतीय क्रिकेट (Team India) चाहत्यांना अपेक्षा आहे. विराट कोहली (Virat Kohli) सध्या भारतातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक असेल. 2011 मध्ये विराट कोहलीने 22 व्या वर्षी विश्वचषकात (World Cup 2011) पदार्पण केले होते. विश्वचषकाचा (World Cup) तगडा अनुभव असणाऱ्या विराट कोहलीकडे तीन महारेकॉर्ड करण्याची संधी आहे. या विश्वचषकात विराट (Virat Kohli World Cup) या विक्रमाला गवसणी घालणार का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
रिकी पाँटिंग-जयसूर्या यांचा विक्रम मोडणार ?-
रनमशीन विराट कोहलीकडे रिकी पाँटिंग आणि सनथ जयसूर्या यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. विराट कोहलीने 281 सामन्यातील 269 डावात 57.38 च्या जबराट सरासरीने 13083 धावांचा पाऊस पाडला आहे. विश्वचषकात विराट कोहलीने 622 धावा केल्यास, वनडेमध्ये सर्वाधिक धावांचा जयसूर्या आणि पाँटिंगचा विक्रम मोडू शकतो. वनडेमध्ये रिकी पाँटिंगच्या नावावर 13704 धावा आहेत. तर सनथ जयसूर्याच्या नावावर 13430 धावांची नोंद आहे. हा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीकडे असेल.
रोहित-धोनीच्या पंक्तीत होणार दाखल -
विराट कोहलीने तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 283 षटकार ठोकले आहेत. विश्वचषकात विराट कोहलीने 17 षटकार मारल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 पेक्षा जास्त षटकार मारणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरले. याआधी भारतासाठी रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांनी हा पराक्रम केला आहे. रोहितच्या नावावर 551 षटकारांची नोंद आहे तर धोनीने 359 षटकार ठोकलेत. विराट कोहलीने 17 षटकार मारल्यास या खास पंक्तीत स्थान मिळेल. त्याशिवाय आठ षटकार मारताच वनडे क्रिकेटमध्ये 150 षटकार ठोकणारा सहावा भारतीय खेळाडू होऊ शकतो. वनडेमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 142 षटकार मारले आहेत. भारताकडून वनडेमध्ये 150 पेक्षा जास्त षटकार रोहित,धोनी, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि युवराज सिंह यांनी मारले आहेत.
26000 आंतरराष्ट्रीय धावा -
यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली मोठा माइलस्टोन पार करणार आहे. विश्वचषकात 233 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26 हजार धावांचा टप्पा विराट कोहली पार करेल. विराट कोहलीने तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 507 सामन्यात 25767 धावा केल्या आहेत. 233 धावा करताच 26 हजार धावा करणारा विराट तिसरा भारतीय खेळाडू होईल. सचिन तेंडुलकर याने 34357 धावा केल्या आहेत. तर कुमार संगाकारा याने 28016 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने या विश्वचषकात 233 धावा करताच माइलस्टोन पार करेल.