विश्वचषकात भारत पाकिस्तानवर भारी, पण टीम इंडियाला कांगारुंनी फोडलाय घाम, पाहा आकडेवारी
World Cup 2023 : विश्वचषकाचा 13 वा हंगाम असेल. आतापर्यंत झालेल्या 12 वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरोधात कधीही हरलेला नाही.
ICC Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघे काही तास शिल्लक आहेत. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या (World Cup 2023) रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने (Team India) आपली तयारीही पूर्ण केली आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राउंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक संघाचे किमान नऊ सामने होणार आहेत. या नऊ संघाविरोधात विश्वचषकात भारतीय संघ किमान एकदा तरी खेळला आहे. त्या संघाविरोधात टीम इंडियाची कामगिरी कशी आहे, याबाबत जाणून घेऊयात.
हा विश्वचषकाचा 13 वा हंगाम असेल. आतापर्यंत झालेल्या 12 वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरोधात कधीही हरलेला नाही. आतापर्यंत विश्वचषकात दोन्ही संघाचा सातवेळा आमनासामना झाला, या सर्व सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. भारताविरोधात विजय मिळवण्यासाठी पाकिस्तान संघ प्रत्येकवेळी ताकदीने मैदानात उतरतो, पण त्यात त्यांना यश मिळत नाही. पाकिस्तानशिवाय नेदर्लंड्स आणि अफगाणिस्तान संघाला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही. भारताने नेदर्लंड्सला दोन वेळा पराभूत केले आहे तर अफगाणिस्तानला एकवेळा पराभूत केले आहे.
श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये विश्वचषकात आठ वेळा सामना झाला आहे. दोन्ही संघाने 4-4 सामने जिंकले आहेत. यंदा कोणता संघ बाजी मारणार.. हे लवकरच समजेल. भारताविरोधात ऑस्ट्रेलिया संघाचे पारडे सर्वात जड आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये विश्वचषकात 12 वेळा आमनासामना झालाय. यामध्ये ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने 2019, 2011, 1987 आणि 1983 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
ऑस्ट्रेलियाशिवाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरोधात भारतीय संघाची कामगिरी खराब आहे. न्यूझीलंडने एकूण आठपैकी पाच सामन्यात भारताचा पराभव केला आहे. तर दक्षिण आफ्रिका संघाने पाच सामन्यापैकी तीन सामन्यात भारताचा पराभव केला आहे.
India's record against each opponent at the ICC Cricket World Cup:
विश्वचषकात सहभागी असणाऱ्या संघाविरोधात भारताची कामगिरी कशी ?
पाकिस्तान (Pakistan) : 7-0.
श्रीलंका Sri Lanka: 4-4.
ऑस्ट्रेलिया Australia: 4-8.
बांगलादेश Bangladesh: 3-1.
इंग्लंड England: 3-4.
न्यूझीलंड New Zealand: 3-5.
नेदर्लंड्सNetherlands: 2-0.
दक्षिण आफ्रिका South Africa: 2-3.
आफगाणिस्तान Afghanistan: 1-0.
India's record against each opponent at the ICC Cricket World Cup:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 2, 2023
Pakistan: 7-0.
Sri Lanka: 4-4.
Australia: 4-8.
Bangladesh: 3-1.
England: 3-4.
New Zealand: 3-5.
Netherlands: 2-0.
South Africa: 2-3.
Afghanistan: 1-0. pic.twitter.com/IUtVnHf6vk
चेन्नईत भारत-ऑस्ट्रेलियाचा आमना सामना -
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 8 ऑक्टोबरपासून आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात करत आहेत. चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्यानंतर भारत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरोधात दोन हात करेल. हा सामना दिल्लीमध्ये होणार आहे. अहमदाबादमध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांची लढत होणार आहे.
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ -
5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.