एक्स्प्लोर

साहेबांच्या पराभवानंतर गुणतालिकेत मोठा बदल, कांगारु थेट तळाला, भारत कोणत्या क्रमांकावर?

World Cup 2023, ENG vs AFG : रविवारी अफगाणिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात मोठा उलटफेर केला. अ

World Cup 2023, ENG vs AFG : रविवारी अफगाणिस्तान संघाने यंदाच्या विश्वचषकात मोठा उलटफेर केला. अफगाणिस्तान संगाने गतविजेत्या इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. अफगाणिस्तान संघाने साहेबांचा पराभव करत गुणतालिकेत मोठा फेरबदल केला आहे. पाच वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया दहाव्या क्रमांकावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांचा रनरेटही खालावला आहे. अफगाणिस्तान संघ याआधी दहाव्या क्रमांकावर होता, तर ऑस्ट्रेलियाचा संघ नवव्या स्थानावर विराजमान होता, पण साहेबांचा पराभव करत अफगाण संघाने ऑस्ट्रेलियाला दहाव्या क्रमांकावर ढकलले आहे. 

सामन्यात काय झालं ?

विश्वविजेत्या इंग्लंडने स्वप्नातही कल्पना केली नसेल अशी दमदार कामगिरी रविवारी अफगाणिस्ताने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर केली. 285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विश्वचषकाच्या 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या मुजीबूर रहमान (3 विकेट), रशीद खान (3 विकेट) आणि मोहम्मद नबी (2 विकेट) यांनी आठ विकेट घेत इंग्लंडला पार नेस्तनाबूत झाला. फारुकी आणि नावीन  हकने प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतना 284 धावा कुटल्या. इंग्लंडने या सामन्यामध्ये तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला, तरीही अफगाणिस्तानला रोखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं नाही. अफगाणिस्तानचा डाव शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर संपला. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. 

गुणतालिकेत भारत कोणत्या क्रमांकावर ?

पाकिस्तानचा पराभव करत शनिवारी भारताने गुणतालिकेत अव्वल स्थानावर कब्जा केला आहे. भारतायी संघाचे तीन सामन्यात सहा गुण झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या न्यूझीलंडचेही सहा गुण आहेत. पण भारताचा रनरेट चांगला आहे, त्यामुळे भारत टॉपवर आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांचे समान गुण आहेत. पण दक्षिण आफ्रिकेचा रनरेट सरस असल्यामुळे चार गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाला तीन सामन्यात दोन विजय आणि एका पराभवाचा सामना करावा लागला. 

साहेबांचा पराभव करत अफगाणिस्तान संघाने दहाव्या क्रमांकावरुन थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ नवव्या स्थानावरुन दहाव्या स्थानी घसरला आहे. इंग्लंडचा संघ तीन सामन्यात दोन पराभवासह गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM  06 October 2024Sanjay Raut Full PC : ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHASambhajiraje Navi Mumbai : 8 वर्ष झाले, शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही? संभाजीराजे आक्रमकManoj Jarange Beed : मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांच्या भेटीला जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला, बदल्यात मुलीशी लग्न लावण्याचे आश्वासन!
Bopdev Ghat Incident: बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट
Sambhaji Raje: सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही; संभाजीराजेंचा उद्विग्न सवाल
सर्व परवानग्या नव्हत्या तर मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन कसं केलं? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
आलेला पगार पुरत नाहीये? फक्त 'या' पाच सोप्या टिप्स फॉलो करा, बँकेत जमा होतील बक्कळ पैसे!
Rahul Gandhi : राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
राहुल गांधींमध्ये ख्रिश्चन आईने बिंबवलेले संस्कार, कोल्हापुरात येऊन अंबाबाईच्या दर्शनाला गेले नाहीत, भाजपचं टीकास्त्र
S Jaishankar Pakistan Visit : मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
मोदी सरकारमधील मंत्री तब्बल 9 वर्षांनी पाकिस्तानात जाणार, इम्रान खान यांच्या पक्षाने घेतला वेगळाच निर्णय!
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Embed widget