Women's T20 Challenge : कोरोना व्हायरसमुळे क्रिडा विश्वावरही परिणाम झाला आहे. तसेच अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये वेगवान धावपटू बोल्ट, फुटबॉलचा बादशाह ख्रिस्तियाने रोनाल्डोसह अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला होता. चेन्नई सुपर किंग्स संघातील स्टार गोलंदाज दीपक चहर, ऋतुराज गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशातच आता भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार गोलंदाज मानसी जोशीला कोरोनाची लागण झाली आहे. कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे मानसी आता दुबईत खेळवण्यात येणाऱ्या महिला टी20 चॅलेंजमध्ये सहभागी होणार नाही.



27 वर्षीय मानसी जोशीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे ती सध्या देहराडूनमध्ये क्वॉरंटाईन आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील इतर खेळाडू 13 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मानसी क्वॉरंटाईन असल्यामुळे ती मुंबईत दाखल झालेली नाही.


मीडिया रिपोर्टनुसार, मिताली राजच्या नेतृत्त्वात टी20 चॅलेंजमध्ये सहभागी होणाऱ्या संघात मानसीची जागा 26 वर्षीय वेगवान गोलंदाज मेघना सिंह घेणार आहे. मानसीने 2016मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघात पदार्पण केलं होतं. त्यानंतर भारतासाठी 11 एकदिवसीय आणि आठ टी20 सामन्यांसाठी देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे.


लवकरच होणार क्रिकेटची वापसी


दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फेब्रुवारीपासून भारतात आतंरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवण्यात आलेले नाहीत. परंतु, आता बीसीसीआयच्या वतीने भारतात क्रिकेटच्या वापसीसाठी जोमाने प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :