Womens IPL 2023 : महिला आयपीएलच्या प्रसारण हक्कांसाठी बीसीसीआयनं मागवले अर्ज, पाच हंगामांसाठीच्या हक्कांची होणार विक्री
Womens IPL 2023 : बहुप्रतिक्षीत महिला आयपीएलचं आयोजन पुढच्या वर्षी मार्च महिन्यात केलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरसह भारताच्या अनेक महिला क्रिकेटपटू यामध्ये सामिल होणार आहेत.
Women's IPL 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिला आयपीएलच्या आयोजनासाठी तयारी सुरू केली आहे. मंडळाने पहिल्या पाच सीझनचे मीडिया हक्क विकण्यासाठी अर्ज मागवले आहेत. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने एक निविदा जाहीर केली आहे. या निविदेतंर्गत 2023-27 पर्यंत महिला IPL च्या मीडिया हक्कांच्या खरेदीसाठी अर्ज मागवले गेले आहेत. ज्यांना माध्यमांचे अधिकार विकत घ्यायचे आहेत त्यांना या निविदेअंतर्गत कागदपत्रे सादर करावी लागतील आणि त्यानंतर बोली लावून हक्क मिळवता येतील.
निविदा प्रक्रियेत बिडिंग पद्धती, मीडिया हक्क पॅकेज आणि इतर माहितीबद्दल अधिक डिटेल्स दिले गेले आहेत. पाच लाख रुपये जमा करणाऱ्यांनाच मीडिया अधिकार मिळवता येणार आहेत. दरम्यान हे पाच लाख रुपये नॉन रिफन्डेबल असणार असून मीडिया अधिकार मिळाले किंवा नाही तरीही हे पाच लाख रुपये परत केले जाणार नाहीत. 31 डिसेंबरपर्यंत पेपर्स खरेदी करता येणार असून त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. बीसीसीआयने एक फॉरमॅट तयार केला आहे. बीसीसीआय महिला क्रिकेटला सतत प्रोत्साहन देत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून महिलांची आयपीएल म्हणून काही प्रदर्शनीय सामने आयोजित केले जात होते आणि त्याचे मोठ्या लीगमध्ये रूपांतर होण्याची अपेक्षा सातत्याने व्यक्त केली जात होती. आता ती आशा खरी ठरली असून पुढील वर्षापासून ही लीग सुरू करण्यासाठी मंडळ सज्ज झाले आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका खेळत असलेल्या बीसीसीआयकडून भारतीय महिला क्रिकेट संघालाही खूप प्रोत्साहन मिळत आहे.
महिला आयपीएल लीगच्या संघाची नावं कशी असतील?
क्रिकेट वेबसाईट क्रिकबझनं दिलेल्या वृत्तानुसार, बोर्डानं अद्याप महिला आयपीएल संघ शहरांच्या नावावर किंवा झोनच्या नावावर विकण्याचा निर्णय घेतलेला नाही. संघ क्षेत्रानुसार विकले गेल्यास ते उत्तर (जम्मू/धर्मशाला), दक्षिण (कोची/विशाखापट्टणम), मध्य (इंदूर/नागपूर/रायपूर), पूर्व (रांची/कटक), उत्तर पूर्व (गुवाहाटी) आणि पश्चिम (पुणे/राजकोट) असं असण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी पुरूष आयपीएलचे सामने खेळले जात नाहीत, अशा ठिकाणीच महिला आयपीएल लीगमधील सामन्यांचं आयोजन केलं जाऊ शकतं.
या पद्धतीन सामने खेळवले जातील
बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. महिला आयपीएल लीगच्या गट सामन्यात संघ दोनदा एकमेकांसमोर येतील. या लीगमधील अव्वल संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असेलल्या संघाला संघाला एलिमिनेटर सामने खेळून अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळेल.
हे देखील वाचा-