Shikhar Dhawan: वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (West Indies vs India) विजय मिळवून भारतीय संघानं मालिकेत 2-0 नं खिशात घातलीय. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना औपचारिकता म्हणून खेळला जाईल. या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या शिखर धवननं (Shikhar Dhawan) विशेष पंक्तीत स्थान मिळवलं आहे. वेस्ट इंडीजच्या संघाला एकदिवसीय मालिकेत त्यांच्याच मायभूमीवर पराभूत करणारा शिखर धवनं पाचवा भारतीय कर्णधार ठरलाय. 


वेस्ट इंडिजच्या भायभूमीवर एकदिवसीय मालिका जिंकणारे कर्णधार
वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं सर्वाधिक दोन वेळा एकदिवसीय मालिका जिंकलीय. भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजच्या संघाला त्यांच्याच मायभूमीवर नमवलं होतं. त्यानंतर भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं विजयाचा क्रम पुढे नेला. परंतु, धोनीच्या नेतृत्वात भारताला वेस्ट इंडिजमध्ये केवळ एकदाच एकदिवसीय मालिका जिंकलीय. त्यानंतर सुरेश रैनानंही एकदा वेस्ट इंडीजच्या भूमीवर एकदिवसीय मालिकेत भारताल विजय मिळवून दिला होता. या यादीत भारताचा सलामीवीर शिखर धवनंही वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सामील झालाय.


रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाय होपच्या शतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 311 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं दोन विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा अक्षर पटेलला (35 चेंडूत 64 धावा) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 


हे देखील वाचा-