IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने 2 गडी राखून शानदार असा विजय मिळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकत भारताने मालिकेतही 2-0 ची विजयी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकत वेस्ट इंडीजने फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. ज्यानंतर त्यांनी 312 धावांचे तगडे आव्हान भारतासमोर ठेवले. भारताने अक्षर, श्रेयस आणि संजूच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य पूर्ण केले, तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


IND vs WI 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आज मात्र नाणेफेक जिंकूनही वेस्ट इंडीजला सामना जिंकता आला नाही. पण सामना अत्यंत चुरशीचा झाला0. 

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात वेस्ट इंडीजने 50 षटकात 311 धावा केल्या. विजयासाठी भारताला 50 षटकात 312 धावा करायच्या होत्या. अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात भारताकडून अक्षरने केलेली फलंदाजी सर्वात उत्कृष्ट ठरली.

  3. नाणेफेक जिंकत प्रथम वेस्ट इंडीजने फलंदाजी घेतली.

  4. फलंदाजीसाठी मैदानात आलेले वेस्ट इंडीजचे सलामीवीर शाय होप आणि कायल मायर्स यांनी दमदार अशी अर्धशतकी भागिदारी केली. 39 धावा करुन मायर्स बाद झाल्यावर एस. ब्रुक्सने देखील 35 धावा ठोकत होपला साथ दिली.

  5. त्यानंतर पूरनने होपसोबत एक मोठी भागिदारी उभारली. पूरन 74 धावा ठोकून तंबूत परतला. पण होपने फटकेबाजी सुरु ठेवली. 115 धावा करुन तो बाद झाला. पण त्याच्या शतकाच्या जोरावर विंडीजने भारतासमोर 312 धावांचे आव्हान ठेवले.

  6. 312 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार शिखर 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर गिल आणि अय्यरने डाव सावरला खरा पण 43 धावा करुन गिलही बाद झाला.

  7. त्यानंतर संजू आणि श्रेयस यांनी डाव सावरला. 63 धावा करुन अय्यर बाद झाला खरा पण संजूने झुंज कायम ठेवली. पण 54 धावा करुन तोही बाद झाला.

  8. भारताची स्थिती अत्यंत बिकट झाली असताना दीपक हुडाने अक्षर पटेलसोबत मोर्चा सांभाळला. दोघांनी फटकेबाजी सुरु केली. पण तितक्यात 33 धावा करुन हुडा बाद झाला.

  9. अक्षरच्या खांद्यावर सर्व सामना येऊन ठेपला. त्याच वेळी त्याने अगदी अप्रतिम कामगिरी करत संयमी अर्धशतक ठोकलं. कारकिर्दीतील पहिलं वहिलं एकदिवसीय अर्धशतक ठोकत त्याने सामना भारताला जिंकवून दिला. 

  10. सामन्यात नाबाद 64 धावांची दमदार खेळी आणि एक विकेट घेणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सामनावीर ठरला. 


हे देखील वाचा-