India vs West Indies: त्रिनिदादच्या (Trinidad) क्वीन्स पार्क ओव्हल (Queen's Park Oval) स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजचा दोन विकेट्सनं पराभव केला. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचणारा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनं (Axar Patel) अखरेच्या काही षटकात वादळी खेळी करत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केलाय. वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघानं एका मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम भारताचा नावावर नोंदवला गेलाय. याआधी एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. 

भारताची विश्वविक्रमाला गवसणी
दरम्यान, एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. पाकिस्ताननं 996 पासून 2020 पर्यंत झिम्बॉब्वेविरुद्ध सलग 11 मालिका जिंकल्या आहेत. तर, भारतानं 2007 पासून वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत एकही मालिका गमावली नाही. भारतानं गेल्या 15 वर्षात वेस्ट इंडीजला 11 वेळा पराभूत केलं होतं. मात्र, काल खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारतानं वेस्ट इंडीजविरुद्ध बाराव्यांदा मालिका जिंकण्याचा पराक्रम केलाय. 

एका संघाविरुद्ध सर्वाधिक मालिका जिंकणारा संघ- 

क्रमांक संघ विरुद्ध संघ विजयी मालिका
1 भारत वेस्ट इंडीज 12
2 पाकिस्तान झिम्बॉव्वे 11
3 पाकिस्तान  वेस्ट इंडीज 10
4 दक्षिण आफ्रिका झिम्बॉव्वे 09
5 भारत श्रीलंका 09

 

रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाय होपच्या शतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने निर्धारित 50 षटकांत सहा गडी गमावून 311 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं दोन विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा अक्षर पटेलला (35 चेंडूत 64 धावा) सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 

हे देखील वाचा-