Yash Dayal banned from UPT20 : विराट कोहलीच्या लाडक्या क्रिकेटपटूवर बंदी, 'या' मोठ्या टी-20 लीगमध्ये हकालपट्टी; का झाली कारवाई? जाणून घ्या
Yash Dayal Update News : भारताचा उभरता वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

Why Yash Dayal banned from UPT20 2025 : भारताचा उभरता वेगवान गोलंदाज यश दयाल याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बलात्काराच्या प्रकरणात अडकलेल्या यश दयालवर आता बंदी घालण्यात आली आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीकडून खेळणारा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल यंदाच्या यूपीटी-20 लीगमध्ये मैदानात दिसणार नाही. यूपी क्रिकेट असोसिएशनने (UPCA) त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
यश दयालवर का झाली कारवाई?
जयपूरच्या सांगानेर सदर पोलीस ठाण्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली यश दयालविरुद्ध एफआयआर दाखल झाल्यानंतर UPCA ने ही कारवाई केली आहे. यश दयालला शेवटचे मे महिन्याच्या सुरुवातीला आयपीएल 2025 जिंकणाऱ्या आरसीबी संघाचा भाग म्हणून पाहिले गेले होते. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे.
युपीटी-20 मध्ये खेळणार नाही यश दयाल
दैनिक जागरणच्या अहवालानुसार, गोरखपूर लायन्स संघाने 7 लाख रुपयांत खरेदी केलेल्या यश दयालला UPCA ने युपीटी-20 2025 मध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. UPCA च्या सूत्रांनी सांगितले की, त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन वेगवेगळ्या ठिकाणी दाखल एफआयआर
सुरुवातीला गाझियाबादमध्ये एका महिलेने यश दयालविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तिचा आरोप होता की, लग्नाचे आमिष दाखवून यश दयालने तिचे लैंगिक शोषण केले. ही तक्रार 21 जून रोजी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री तक्रार पोर्टलवर नोंदवली गेली, त्यानंतर औपचारिक एफआयआर दाखल करण्यात आली. या प्रकरणात इलाहाबाद उच्च न्यायालयाने यश दयालच्या अटकेवर स्थगिती दिली होती.
मात्र, जुलैच्या सुरुवातीला जयपूरमध्ये त्याच्यावर आणखी एक एफआयआर दाखल झाला. या वेळी राजस्थान उच्च न्यायालयाने अटकेवर स्थगिती देण्यास नकार दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.
हे ही वाचा -





















