Vaibhav Suryavanshi Ind A vs Ban A : वैभव सूर्यवंशी सुपर ओव्हरमध्ये का उतरला नाही? ड्रेसिंग रूममध्ये नेमकं काय घडलं? कर्णधार जितेश शर्मा स्पष्टचं बोलला
Why Vaibhav Suryavanshi Not play in Ind A vs Ban A Super Over : आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने जिंकलेला सामना जिंकता जिंकता सामना हरला.

Bangladesh A beats India A in Rising Stars Asia Cup Semi-Final : आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने जिंकलेला सामना जिंकता जिंकता सामना हरला. बांगलादेशविरुद्धचा हा थरारक सामना सुपर ओव्हरपर्यंत रंगला, पण इथेच भारताची सर्वात मोठी चूक समोर आली. सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघ एकही रन न करता ऑलआऊट झाला आणि बांगलादेशने केवळ एका वाइडच्या जोरावर सामना खिशात टाकला. या पराभवानंतर टीम मॅनेजमेंटच्या निर्णयांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले, विशेषतः वैभव सूर्यवंशीला सुपर ओव्हरमध्ये संधी न देण्याबद्दल.
सुपर ओव्हरमध्ये नेमकी कुठे चूक झाली?
194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शेवटच्या टप्प्यात अफलातून पुनरागमन करत सामना सुपर ओव्हरपर्यंत आणला. याच वेळी 15 चेंडूत 38 धावा ठोकत वैभव सूर्यवंशीने भारतीय विजयी आशा जिवंत ठेवल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांना खात्री होती की सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा वैभवच उतरणार. पण निर्णय उलट झाला, कर्णधार जितेश शर्मा, रामदीप सिंह आणि आशुतोष शर्मा यांना पाठवण्यात आले. आणि त्याचा परिणाम? भारत एकही रन न करता दोन चेंडूत दोन विकेट गमावून शुन्यावर डाव संपला.
सुपर ओव्हरच्या आधी ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? कर्णधार जितेश शर्माचं स्पष्टीकरण
सामन्यानंतर या वादग्रस्त निर्णयाबाबत जितेश म्हणाला की, “वैभव आणि प्रियंश पावरप्ले स्पेशलिस्ट आहेत. पण डेथ-ओव्हर मारणे मला, आशुतोष आणि रामदीपला चांगले जमते. त्यामुळे हा टीमचा निर्णय होता.” पण, जितेशच्या या स्पष्टीकरणाने फॅन्सची नाराजी कमी झाली नाही. चाहत्यांनी सवाल केला की, “ज्याने संपूर्ण सामन्यात सर्वात चांगली फलंदाजी केली, त्यालाच सुपर ओव्हरमध्ये का बसवलं?”
बांगलादेशने कसा जिंकला सामना?
बांगलादेशकडून रिपोन मंडलने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करत भारताला पूर्णपणे दबावाखाली ढकललं. भारताकडून गोलंदाजी करताना सुयश शर्माने टाकलेली एक वाइडच बांगलादेशला विजय मिळवून देणारा ठरला. पहिल्या चेंडूवरच बांगलादेशचा फलंदाज बाद झाला होता, पण भारताची फलंदाजी एवढी दडपणाखाली होती की तीन चेंडूतही एकही धाव काढता आली नाही. भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये केलेल्या निर्णय चुका. विशेषतः वैभव सूर्यवंशीला न पाठवण्याची रणनीती. आता मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. फॅन्स अजूनही एका प्रश्नावर ठाम आहेत.
हे ही वाचा -





















