Shubman Gill Retired Hurt : फक्त 3 बॉल खेळल्यानंतर कर्णधार शुभमन गिल रिटायर्ड हर्ट; मैदानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Shubman Gill Retired hurt IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे.

Shubman Gill Retired hurt IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 159 धावा केल्या. त्यानंतर भारताची पहिल्या डावात फलंदाजी सुरू आहे. दरम्यान संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार शुभमन गिल फक्त चार धावांच्या वैयक्तिक धावसंख्येसह रिटायर्ड हर्ट झाला. ही घटना दुसऱ्या दिवशी (15 नोव्हेंबर) खेळाच्या पहिल्या सत्रात घडली. भारतीय डावाच्या 35 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरची विकेट पडली, सायमन हार्मरच्या गोलंदाजीवर एडेन मार्करामने त्याला झेलबाद केले.
Eden Gardens welcomed Shubman Gill with a lot of cheering 💙 #INDvSA pic.twitter.com/DPlS5aeoOL
— sohom (@AwaaraHoon) November 15, 2025
मैदानात नेमकं काय घडलं?
शुभमन गिलने त्याच्या इनिंगच्या तिसऱ्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेच्या स्पिनर हार्मरला चौकार मारला. पण त्यानंतर लगेचच तिने मान पकडली. मग टीम इंडियाचे फिजिओ मैदानात आले आणि गिलची तपासणी केली. स्थिती पाहता त्यांनी गिलला तत्काळ मैदानाबाहेर नेण्याचा निर्णय घेतला. पवेलियनकडे परतताना तो किती वेदनेत दिसत होता, हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
Shubman Gill retires hurt due to discomfort in neck. pic.twitter.com/VSFgcfPZRP
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2025
शुभमन गिलची दुखापत किती गंभीर?
रिटायर्ड हर्ट होताना गिल 3 चेंडूत 4 धावा करून खेळत होता. आशा आहे की शुभमन गिलची दुखापत गंभीर नाही आणि तो या सामन्यात पुन्हा फलंदाजी करू शकेल. शुभमन मैदानाबाहेर पडल्यानंतर उपकर्णधार ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. प्रेक्षकांनी त्याच्या पुनरागमनाचे कौतुक केले. इंग्लंड दौऱ्यात झालेल्या दुखापतीनंतर ऋषभ भारतीय संघात परतला आहे.
दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. लंचपर्यंत भारताने पहिल्या डावात 4 बाद 138 धावा केल्या असून तो दक्षिण आफ्रिकेपेक्षा फक्त 21 धावांनी मागे आहे. सध्या रवींद्र जडेजा 11 आणि ध्रुव जुरेल 5 धावांवर खेळत आहेत. पहिल्या सत्रात भारताने वॉशिंग्टन सुंदर, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांचे विकेट गमावले. याशिवाय, कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेले आहेत, ही टीमसाठी मोठी चिंता आहे.
Listen to the crowd’s roar when Shubman Gill was walking back to the pavilion and Rishabh Pant was coming to the crease.
— i (@arrestshubman) November 15, 2025
Respect is Earned not begged.pic.twitter.com/1omBSFsIgP
हे ही वाचा -





















