एक्स्प्लोर

Video : मॅच संपू दे मग बघतो, तू माझ्याशी या भाषेत बोलू नकोस; अंपायर धर्मसेनाने केएल राहुलला दिली धमकी, नेमकं काय घडलं?

Kumar Dharmasena VS Kl Rahul : भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका ही केवळ खेळापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मैदानावरील खेळाडूंमधील शाब्दिक चकमक आणि अंपायरिंगच्या वादामुळेही ती चांगलीच गाजतेय.

England vs India 5th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेली कसोटी मालिका ही केवळ खेळापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मैदानावरील खेळाडूंमधील शाब्दिक चकमक आणि अंपायरिंगच्या वादामुळेही ती चांगलीच गाजतेय. शुभमन गिल, बेन स्टोक्स, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, बेन डकेट आणि क्रिस वोक्स हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेच, पण जे नेहमी शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात, असे के. एल. राहुल आणि जो रूटसुद्धा आपला संयम गमावताना दिसले.

ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी अंपायर धर्मसेना भडकले....

या सगळ्यात कमाल म्हणजे दुसऱ्या दिवशी ओव्हल टेस्टमध्ये जेव्हा श्रीलंकेचे अनुभवी अंपायर कुमार धर्मसेना के. एल. राहुलवर चिडले आणि थेट त्याला इशाराच देऊन टाकला, "आपण सामना संपल्यानंतर पाहू. तू अशा प्रकारे बोलू शकत नाहीस."

नेमकं काय घडलं?

घटना अशी घडली की, इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आणि भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्यात मैदानावर किरकोळ वाद झाला. ही चकमक शांत व्हावी म्हणून अंपायर धर्मसेना पुढे आले. पण भारताचा खेळाडू के. एल. राहुल आपल्या सहकाऱ्याच्या समर्थनार्थ पुढे आला आणि अंपायरला थेट विचारलं, "तुम्हाला काय वाटतं, आम्ही काहीही प्रतिक्रिया न देता फक्त फलंदाजी-गोलंदाजी करून निघून जावं? यावर धर्मसेना भडकले आणि म्हणाले, "तू असं बोलू शकत नाहीस. आपण सामन्यानंतर बोलूया. हे असं चालणार नाही."

थोडक्यात त्यांच्यात काय संवाद झाला पाहू?

के. एल. राहुल : “आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? आम्ही शांत राहावं का?”

धर्मसेना : “तुला वाटतं एखादा गोलंदाज तुझ्याजवळ येऊन काही बोलेल आणि तू शांत राहशील? असं चालत नाही राहुल.”

राहुल : “मग आम्ही काय फक्त खेळून निघून जावं?”

धर्मसेना : “सामन्यानंतर बोलू. तू अशा भाषेत बोलू नकोस.”

या प्रकारानंतर सामन्याचा तणाव वाढला होता. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, मैदानावरील प्रत्येक क्षण हा खेळाडूंमध्ये भावना, दबाव आणि संयमाची कसोटी पाहणारा असतो.

भारताची इंग्लंडवर 52 धावांची आघाडी 

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वालच्या नाबाद 51 धावांमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध खेळ थांबवेपर्यंत 2 विकेट गमावून 75 धावा केल्या होत्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे 52 धावांची आघाडी आहे. भारताने सलामीवीर केएल राहुल (7) आणि साई सुदर्शन (11) यांचे विकेट गमावले, परंतु जैस्वाल आणि नाईट वॉचमन आकाश दीप (नाबाद 4) यांनी भारताला आणखी धक्का बसू दिला नाही.

तत्पूर्वी, पहिल्या कसोटीत भारताच्या 224 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 247 धावा करून थोडीशी आघाडी घेतली होती. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी चार विकेट घेत भारताकडून शानदार पुनरागमन केले आणि पाहुण्या संघाने इंग्लंडची आघाडी 23 धावांपर्यंत मर्यादित केली.

हे ही वाचा - 

Ind vs Eng 5th Test Day-2 : एका दिवसांत 16 विकेट्स... टीम इंडियाने इंग्लंडला स्वस्तात गुंडाळले, मग जैस्वालने ठोकले तुफानी अर्धशतक; दुसऱ्या दिवशी काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'

व्हिडीओ

KDMC Mayor Reservation News : कल्याण डोंबिवलीत या तिघांना महापौरपदाची संधी
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीत अनुसूचित जमाती प्रवर्गाला आरक्षणाला
KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Nashik Mayor: बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
बहुचर्चित नाशिक महापालिकेत कोण होणार महापौर? हिमगौरी आडकेंसह 'या' महिला नेत्या प्रमुख दावेदार, जाणून घ्या सविस्तर
Kolhapur Mayor Post: कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
कोल्हापूर, इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव; कोणाला मिळणार संधी? की खांडोळीचा खेळ पुन्हा रंगणार??
Indapur ZP Election : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा एकत्र; पुढच्या पिढीला संधी, प्रतिक्रिया देताना म्हणाले, 'आमचं काही बांधाच भांडण...'
Gold Silver Rate : सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 20 हजार रुपयांनी गडगडले, जाणून घ्या नवे दर
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Maharashtra Live Blog Updates: मुंबईत पुन्हा होणार महिला महापौर, 29 महापौरपदांची आरक्षण लॉटरी जाहीर… कुठे SC-ST, कुठे ओबीसी? जाणून घ्या सर्वकाही
Mayor Reservation : मुंबई, पुणे, नागपूरसह 15 महापालिकांमध्ये महिलाराज, महापौरपदाचा मान महिलांना, संपूर्ण यादी
राज्यातील 15 महापालिकांमध्ये महिला राज, मुंबई- नागपूरमध्ये महिला महापौर होणार, संपूर्ण यादी एका क्लिकवर
KDMC Mayor: बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
बहुचर्चित कल्याण डोंबिवली महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव; या सहाजणांपैकी कोणाला संधी मिळणार?
Embed widget