Hardik Pandya - Mahieka Sharma : हार्दिक पांड्या संतापला! गर्लफ्रेंड माहिका शर्माचा नको त्या अँगलने व्हिडिओ शूट; वांद्रेतील हॉटेल बाहेर नेमकं काय घडलं?, Video आला समोर
Hardik Pandya girlfriend Mahieka Sharma News : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वीच हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Hardik Pandya Instagram story for Mahieka Sharma : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वीच हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हार्दिक पांड्या सोशल मीडियावर नेहमीच बिंदास फोटोज शेअर करताना दिसतो. सोशल मीडियावर त्याच्याबद्दलच्या अफवा अनेकदा पसरतात, परंतु हा स्टार खेळाडू क्वचितच प्रतिक्रिया देतो. पण, यावेळी गोष्ट इतकी पर्सनल झाली की त्याचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याला त्याची प्रेयसी माहिका शर्मा व्हिडिओवरून प्रचंड संतापला.
माहिका शर्माच्या व्हिडिओवरून हार्दिक पांड्याचा संताप...
हार्दिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्याने काही फोटो जर्नलिस्ट्सवर जोरदार टीका केली आहे. पांड्याचा आरोप आहे की माहिका जेव्हा मुंबईतील वांद्रे येथील एका हॉटेलमधून बाहेर पडत होती, तेव्हा पापाराझींनी तिचा व्हिडिओ चुकीच्या अँगलने शूट केला. त्यांच्या मते, हा कोणत्याही महिलेबद्दल अनादर करणारा प्रकार आहे.
The reason why Hardik Pandya post Instagram story for Mahieka Sharma.https://t.co/EdtlziwoUk https://t.co/42Kyk6Az6N
— Niroy⁴⁵🐐 (@Niroy45) December 9, 2025
हार्दिक म्हणतो की, “मी जे आयुष्य निवडले आहे, त्यात सतत मी लोकांच्या नजरेत येतो. त्यांचे लक्ष सतत माझ्यावर आणि माझ्यासोबतच्या व्यक्तिंवर असते. पण आज जी एक गोष्ट घडली, त्याने सीमा ओलांडली आहे. माहिका वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पायऱ्या उतरत असताना पापाराझींनी तिला चुकीच्या अँगलने टिपण्याचा निर्णय घेतला. ज्या अँगलमधून कोणत्याही महिलेचे फोटो काढणे योग्य नाही."
पुढे तो पापाराझीना आवाहन करत म्हणतो, हे हेडलाईन किंवा कोणी काय क्लिक केले याबद्दल नाही, तर ते मूलभूत आदराबद्दल आहे. महिलांना सन्मान मिळायला हवा. प्रत्येकाला मर्यादा असायला हव्या आहेत. मीडिया बांधव दररोज कठीण परिश्रम करतात आणि मी तुमच्या कामाचा आदर करतो. मी नेहमीच तुम्हाला सहकार्य करतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कृपया थोडे अधिक जागरूक रहा. प्रत्येक गोष्ट टिपण्याची गरज नाही. प्रत्येक अँगल घेण्याची गरज नाही.
सध्या कटकमध्ये टीमसोबत
हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियासोबत कटकमध्ये असून द. आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना येथून सुरू होणार आहे. आशिया कपमध्ये दुखापत झाल्यामुळे तो दोन महिने संघाबाहेर होता. हा त्याचा कमबॅक सामना असणार आहे. मात्र, सामन्यापूर्वीच असा वाद उद्भवल्याने त्याचा मूड खराब झाला आहे. तरीही, तो या प्रकरणापासून दूर राहून मैदानावर उत्कृष्ट प्रदर्शन करेल अशी अपेक्षा आहे.
The reason why hardik pandya put insta story about her girl friend mahieka sharma.... https://t.co/QEfOjNt8eY pic.twitter.com/07ACAVLu0B
— సంచారి (@crazyy__tweets_) December 9, 2025
हे ही वाचा -
IPL Auction 2026 Players List : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?





















