IND vs BAN : अजिंक्य रहाणे अन् चेतेश्वर पुजाराचे करिअर संपलं; बांगलादेशविरुद्ध प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण घेणार जागा?
India vs Bangladesh Chennai Test : भारतीय क्रिकेट संघातील स्टार अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा किती तरी दिवस झाले टीम इंडियाच्या कसोटी संघातून बाहेर आहेत.
India squad for 1st Test vs Bangladesh : भारतीय क्रिकेट संघातील स्टार अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा किती तरी दिवस झाले टीम इंडियाच्या कसोटी संघातून बाहेर आहेत. आता त्यांचे संपण्यात जमा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण युवा खेळाडूंनी त्यांना मिळालेल्या संधीचे दोन्ही हातांनी सोने केले आहे. अशा परिस्थितीत आगामी बांगलादेश मालिकेतील पहिल्या कसोटीत पुजारा आणि रहाणेच्या जागी कोणते खेळाडू खेळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चेतेश्वर पुजाराची जागा कोण घेणार?
भारतीय क्रिकेट संघासाठी भिंती असलेला चेतेश्वर पुजारा आता संघाचा भाग नाही. अशा परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शुबमन गिल चेन्नई कसोटीसाठी निवडलेल्या संघात आहे, जो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. गिलने यापूर्वी कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असून त्याने चांगल्या धावा पण केल्या आहेत. अशा स्थितीत गिलकडे पुजाराचा बदली खेळाडू म्हणून पाहिले जाऊ शकते.
गिलच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 25 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 46 डावांमध्ये 35.52 च्या सरासरीने 1492 धावा केल्या आहेत. यात 4 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.
अजिंक्य रहाणेची जागा कोण घेणार?
चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त अजिंक्य रहाणेच्या जागी 5व्या क्रमांकावर कोण खेळणार? हा सध्या भारतीय संघासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे. सरफराज खान, केएल राहुलसारखे पर्याय आहेत, जे पुजाराच्या जागी पाचव्या क्रमांकावर खेळू शकतात.
भारतीय संघ व्यवस्थापन केएल राहुलला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देऊ शकते, असे मानले जात आहे. राहुलने नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्येही चांगली फलंदाजी करत अर्धशतक केले होते.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
हे ही वाचा -
IND vs BAN : बीसीसीआयने मोहम्मद शमी, श्रेयस अय्यरला का डावललं? जाणून घ्या कारण