कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा करणारे फलंदाज कोण?; विराट कोहली 19 व्या स्थानावर
Test Cricket Career List: आतापर्यंत 14 खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
Batsman with 10,000 Runs in Test Career List: सप्टेंबर महिन्यात भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची द्विपक्षीय कसोटी मालिका होणार आहे. यासाठी बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली देखील या मालिकेत दिसणार आहे. विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत 113 कसोटी सामने खेळले आहेत. तो लवकरात लवकर 10 हजार धावा पूर्ण करेल याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत 14 खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत भारताच्या सचिन तेंडुलकरशिवाय राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर यांचाही समावेश आहे.
कसोटी कारकिर्दीत 10 हजाराहून अधिक धावा करणारे टॉप 5 क्रिकेटपटू-
1. सचिन तेंडुलकर-
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. सचिन 2013 मध्ये निवृत्त झाला. त्यानंतर त्याचा विक्रम कोणीही मोडू शकले नाही. सचिन तेंडुलकरने 200 सामन्यांमध्ये 54.04 च्या स्ट्राईक रेटने 15921 धावा केल्या आहेत. यामध्ये 68 अर्धशतके आणि 51 शतकांचा समावेश आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत या डावात नाबाद 248 धावा केल्या आहेत.
2. रिकी पाँटिंग-
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने 168 कसोटी सामने खेळला आहेत. या 168 सामन्यांमध्ये त्याने 58.72 च्या स्ट्राईक रेटने 13378 धावा केल्या आहेत. यामध्ये 62 अर्धशतके आणि 41 शतकांचा समावेश आहे. रिकी पाँटिंगची सर्वोच्च धावसंख्या 257 आहे.
3. जॅक कॅलिस-
दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिसने एकूण 166 कसोटी सामने खेळले आहेत. 166 सामन्यांमध्ये त्याने 45.97 च्या स्ट्राइक रेटने 13289 धावा केल्या आहेत. यामध्ये 58 अर्धशतके आणि 45 शतकांचा समावेश आहे. जॅक कॅलिसची सर्वोच्च धावसंख्या 224 आहे.
4. राहुल द्रविड-
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने 164 कसोटी सामने खेळले आहेत. या 164 सामन्यांमध्ये त्याने 42.51 च्या स्ट्राइक रेटने 13288 धावा केल्या आहेत. यामध्ये 63 अर्धशतके आणि 63 शतकांचा समावेश आहे. राहुल द्रविडची सर्वोच्च धावसंख्या 270 आहे.
5. ॲलिस्टर कूक-
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ॲलिस्टर कूकने 161 कसोटी सामने खेळले आहेत. या 161 सामन्यांमध्ये त्याने 46.95 च्या स्ट्राइक रेटने 12472 धावा केल्या आहेत. यामध्ये 57 अर्धशतके आणि 33 शतकांचा समावेश आहे. ॲलिस्टर कुकची सर्वोच्च धावसंख्या 294 आहे.
विराट कोहलीच्या 8848 धावा-
सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली 19 व्या क्रमांकावर आहे. त्याने 113 कसोटी सामने खेळले आहेत. या 113 सामन्यांमध्ये त्याने 55.56 च्या स्ट्राइक रेटने 8848 धावा केल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत 30 अर्धशतके आणि 29 शतकांचा समावेश आहे. विराट कोहलीची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या म्हणजे नाबाद 254 धावा.