IND Vs SL Test Series: रविंद्र जाडेजाचा बॅकअप म्हणून निवडलेला सौरभ कुमार आहे तरी कोण?
Who is Saurabh Kumar: भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय.
Who is Saurabh Kumar: भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. दरम्यान, बीसीसीआयनं युवा खेळाडूंना संघात संधी दिलीय. या यादीत भारताचा अष्टपैलू खेळाडू सौरभ कुमारचा समावेश करण्यात आलाय. रविंद्र जाडेजाचा बॅकअप म्हणून त्याची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आलीय.
सौरभ कुमार कोण आहे?
सौरभ कुमार हे भारताच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील एक प्रसिद्ध नाव आहे. सौरभनं सर्व्हिसेससाठी 2014 मध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध पहिला रणजी सामना खेळला होता. त्यानंतर त्यानं उत्तर प्रदेशकडून खेळण्यास सुरुवात केली. सौरभ कुमारनं आतापर्यंत 46 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 24.15 च्या सरासरीनं 196 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 16 वेळा एका डावात 5 आणि 6 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. एक फलंदाज म्हणून त्याने 29.11 च्या सरासरीनं 1572 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतकांचा समावेश आहे. सौरभ कुमार हा देखील दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा एक भाग होता.मात्र,तेथे त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने दोन कसोटीत चार विकेट घेतल्या तर, केवळ 23 धावा केल्या आहेत. नुकताच पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सच्या संघानं सौरभ कुमारला त्याच्या मूळ किंमतीत खरेदी केलंय.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचं वेळापत्रक
बीसीसीआयने मंगळवार श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 24 फेब्रुवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लखनौमध्ये तर, पुढचे दोन सामने धर्मशाळा येथे खेळले जाणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होतील. जिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल. तर, दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल.
श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार),मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार
हे देखील वाचा-
- Ind Vs SL, Team Announcement : बीसीसीआयची तयारी सुरु, चार अनुभवी खेळाडूंना वगळले, रहाणे-पुजारालाही धक्का
- IND vs SL : श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, पाहा संपूर्ण खेळाडूंची यादी
- IND Vs WI, 3rd T20: तिसऱ्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडचं कमबॅक? विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha