Priyank Panchal : भारतीय क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. नव्याने उद्भवलेल्या ओमायक्रॉन (Omicron) या व्हेरियंटच्या संकटामुळे हा दौरा होणार का? असंही म्हटलं जात होतं. पण वेळापत्रकात बदल करुन दौरा खेळवला जाणार आहे. पण आता भारतीय संघावर आणखी एक संकट कोसळलं असून संघाचा महत्त्वाचा खेळाडू आणि कसोटी संघाचा नवनिर्वाचित उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार आहे. पण त्याच्या जागी युवा खेळाडू प्रियांक पांचाल (Priyank Panchal) याला संधी देण्यात आली आहे. तर नेमका हा प्रियांक कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


तर 31 वर्षीय प्रियांक पांचाल हा गुजरात संघाकडून खेळणारा सलामी फलंदाज असून नुकताच तो दक्षिण आफ्रीका दौऱ्यात भारत 'ए' संघाकडून खेळला होता. यावेळी 3 डावांत 40 च्या सरासरीने त्याने 120 रन केले 96 धावा हा त्याचा बेस्ट स्कोर होता. याशिवाय प्रियांक 100 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 24 शतकं आणि 25 अर्धशतकं ठोकली आहेत. यात त्याने 7 हजार 11 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे स्थानिक क्रिकेटमध्ये नाबाद 314 हा प्रियांकचा बेस्ट स्कोर आहे. 75 लिस्ट ए सामन्यात प्रियांकने 40.19 च्या सरासरीने 2 हजार 854 धावा केल्या आहेत. यामध्ये 5 शतकं आणि 18 अर्धशतकं सामिल आहेत.


द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ


विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, प्रियांक पांचाल, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.


स्टँड बाय प्लेअर - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha