Karthik Meiyappan: ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) यूएई संघाचा युवा गोलंदाज कार्तिक मय्यपननं श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रीक घेऊन इतिहास रचला. या स्पर्धेत हॅट्ट्रीक घेणारा कार्तिक मय्यपन पहिला आणि जगातील पाचवा गोलंदाज ठरला आहे. चेन्नईमध्ये जन्मलेला आणि यूएईच्या संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्तिकनं क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलंय. यापूर्वी ब्रेट ली (2007), कर्टिस कॅम्फर (2021), वानिंदु हसरंगा (2021), कगिसो रबाडा (2021) यांनी टी-20 विश्वचषकात हॅट्रीक घेण्याचा पराक्रम केलाय. 


टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीत स्थान मिळवण्यासाठी यूएई आणि श्रीलंका सायमंड स्टेडियमवर महत्वाचा सामना खेळला जातोय.या सामन्यात यूएईनं नाणेफेक जिंकून प्रथम प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 8 विकेट्स गमावून यूएईसमोर 153 धावांचं लक्ष्य ठेवलं. श्रीलंकेच्या डावातील 15व्या षटकात कार्तिक मय्यपननं इतिहास रचला. या षटकात मयप्पननं पॉवर हिटर बानुका राजपक्षे, चारिथ असालंका आणि श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला सलग तीन चेंडूत बाद करून टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रीक घेतली.


व्हिडिओ-






 


कार्तिक मय्यपनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
दरम्यान, 22 वर्षीय कार्तिक मय्यपन त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील केवळ 13वा सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी त्यानं 16च्या सरासरीनं 18 विकेट घेतल्या. 25 धावांत 4 विकेट्स घेणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. कार्तिक मयप्पननं 8 एकदिवसीय 10 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 37 धावा खर्च करून 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय.


टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रीक घेणारा पाचवा गोलंदाज
ऑस्ट्रेलिया वेगवान गोलंदाज ब्रेट लीनं 2007 च्या टी-20 विश्वचषकात पहिल्यांदा हॅट्ट्रीक घेतली होती. महत्वाचं म्हणजे, मागच्या टी-20 विश्वचषकात तीन गोलंदाजांनी हॅट्रीक घेतली. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज कर्टिस कॅम्पफरनं नेदरलँड्सविरुद्ध ही कामगिरी केलीय. त्यानंतर श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं इंग्लंडविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली.


हे देखील वाचा-