T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आज नेदरलँड विरुद्ध नामिबिया (NED vs NAM) यांच्यात सामना पार पडला. अगदी अखेरच्या षटकापर्यंत गेलेल्या सामन्यात अखेर नेदरलँडचा संघ जिंकला पण नामिबियाने कडवी झुंज नक्कीच दिली. आधी फलंदाजी करत नामिबियाचा संघ 20 षटकांत 121 धावाच करु शकला. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या नेदरलँड संघाला 122 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी अखेरच्या षटकापर्यंत मेहनत घ्यावी लागली. अखेर 3 चेंडू शिल्लक असताना नेदरलँडचा संघ विजयी झाला.
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत नामिबिया संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शक्यतो सर्व संघ गोलंदाजी निवडत असताना अशाप्रकारे फलंदाजी घेत नामिबियाने काहीसा वेगळा निर्णय घेतला. ज्यानंतर फलंदाजी आलेल्या नामिबियाच्या फलंदाजांकडून खास कामगिरी झाली नाही, सलामीवीर एम. लिंगेनने 20 तर बार्ड याने 19 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या सामन्यात चमकलेला जॅन फ्रायलिंक याने 48 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार खेचत खेचत 43 रन केले. ज्यामुळे नामिबियाने 122 धावांचे लक्ष्य नेदरलँडसमोर ठेवले.
122 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या नेदरलँडने सुरुवातीपासून संयमी खेळी केली. सलामीवीर मॅक्स आणि विक्रम यांनी अनुक्रमे 35 आणि 39 धावा केल्या तर बास दी लेदेने नाबाद 30 धावा करत विजयापर्यंत संघाला नेलं. ज्यानंतर अखेर 3 चेंडू आणि 5 गडी राखून नेदरलँडने विजय मिळवला. यावेळी बास दी लेदे याने 30 धावा आणि 2 विकेट्स घेतल्या त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये केलेल्या कमाल कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
श्रीलंका विरुद्ध युएई सामना सुरु
आजच्या दिवसाचा दुसरा सामना श्रीलंका विरुद्ध युएई (SL vs UAE) असा रंगणार आहे. नामिबियाने त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंका संघाला मात दिली होती, तर नेदरलँडने युएईला मात दिली होती. त्यामुळे दोघेही स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी मैदानात येतील. हा सामना सुरु झाला असून युएईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली आहे.
हे देखील वाचा-