Indonesia Stadium Stampede: इंडोनेशियातील मलंग येथील कांजुरहान स्टेडियम पाडून पुन्हा बांधलं जाईल, अशी माहिती इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो (Joko Widodo) यांनी आज दिली. याच स्टेडियमवर महिन्याच्या सुरुवातीला सामन्यादरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 133 निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला.  या घटनेचं वर्णन फुटबॉल इतिहासातील सर्वात मोठी आपत्ती म्हणूनही करण्यात आलंय. 


जोको विडोडो यांनी फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, "मलंग येथील कांजुरहान स्टेडियम पाडून पुन्हा बांधलं जाणार असल्याची माहिती दिली. ज्यात खेळाडू आणि समर्थक दोघांची सुरक्षा सुनिश्चित असेल."


ट्वीट-






 


नेमकं प्रकरण काय?
इंडोनिशियाच्या मलंग शहरातील एका मोठ्या स्टेडियममध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाय यांच्यात फुटबॉल सामना रंगला होता. मात्र, सामन्यात पर्सेबाया सुराबाय संघानं अरेमा एफसीवर मात करत सामना 3-2 नं जिंकला. त्यानंतर अरेमा एफसी संघाच्या चाहत्यांनी मैदानावर येत गोंधळ घालायला सुरुवात केली. ज्यामुळं दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानं तेथील सुरक्षारक्षकही आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागले. दोन्ही संघाच्या चाहत्यांमधील वाढता वाद पाहता नॅशनल आर्म फोर्सला घटनास्थळी बोलवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनास्थळी पोहचलेल्या जवानांनी सर्वांना बाहेर काढलं. स्टेडियमच्या बाहेर आल्यानंतरही दोन्ही संघाच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा हाणामारी सुरु झाली. या दुर्घटनेत 133 निष्पात लोकांना जीव गमवावा लागला.


घटनेतील दोषींवर कारवाईचे आदेश
फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबाबत इंडोनेशिया सरकारनं मोठा निर्णय घेतला. या घटनेसाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्याचे आदेश देण्यात आले. या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. तर, अनेकजण गंभीररित्या जखमी झाले आहे.


हे देखील वाचा-