T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा सुरु झाली असून सध्या सुपर 12 साठी क्वॉलीफायर सामने सुरु आहेत. या सामन्यांत जबरदस्त अॅक्शन दिसत असून नुकतीच यंदाच्या विश्वचषकातील पहिली हॅट्रीकही पाहायला मिळाली आहे. युएई संघाचा (UAE) फिरकीपटू कार्तिक मयप्पन (Karthik Meiyappan) याने T20 विश्वचषक 2022 मध्ये पहिली हॅट्रिक घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने एकापाठोपाठ तीन विकेट घेत ही कमाल केली आहे. 


विशेष म्हणजे कार्तिक हा युएईकडून खेळत असला तरी तो मूळचा भारतीय असून 22 वर्षीय कार्तिकचा जन्म भारताच्या चेन्नई येथे झाला आहे. कार्तिकच्या या हॅट्रीकनंतर सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून आयसीसीने देखील त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर कार्तिकच्या हॅट्रीकचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 


पाहा कार्तिकनं घेतलेली हॅट्रिक






सामन्यात नाणेफेक जिंकत युएई संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर श्रीलंका संघाने जबरदस्त फलंदाजी सुरु केली. त्यांचा स्कोर 200 पार जाईल असं वाटत होतं. पण त्याचवेळी युएईचा लेगब्रेक गोलंदाज कार्तिकने 15 वी ओव्हर टाकत श्रीलंकेच्या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडलं. यावेळी कार्तिकने 15 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर भानुका राजपक्षाला 5 धावांवर असलांकासह श्रीलंकन कर्णधार शनाकाला 0 धावांवर तंबूत धाडलं. ज्यामुळे श्रीलंकेचा स्कोर 152 इतकाच होऊ शकला. 


कार्तिक मय्यपनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द


दरम्यान, 22 वर्षीय कार्तिक मय्यपन त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील केवळ 13वा सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी त्यानं 16च्या सरासरीनं 18 विकेट घेतल्या. 25 धावांत 4 विकेट्स घेणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. कार्तिक मयप्पननं 8 एकदिवसीय 10 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 37 धावा खर्च करून 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय.


हे देखील वाचा-