Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) देशांमधील संबंध सलोख्याचे नसल्याने दोन्ही संघ एकमेंकाचा दौरा करत नाहीत. भारत 2005-06 नंतर एकदाही पाकिस्तानत सामना खेळण्यासाठी गेला नसून आता आगामी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) पाकिस्तानात होणार असल्याचं समोर आल्यानंतर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही अशी स्पष्ट घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी केली आहे. ही स्पर्धा दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणी घ्यावी अशी मागणीही शाह यांनी यावेळी केली. बीसीसीआयची सर्वसाधारण सभा (BCCI AGM) नुकतीच पार पडली, यावेळी शाह यांनी ही घोषणा केली.
बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक (1983 World Cup) विजेत्या संघाचे सदस्य आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी (Roger Binny) झाले असून या निर्णयासाठी बीसीसीआयची 91 वी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी इतरही विषयांवर चर्चा झाली असून बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आगामी आशिया कप 2023 बद्दल बोलताना भारत पाकिस्तानला स्पर्धा खेळण्यासाठी जाणार नाही असं स्पष्ट वक्तव्य केलं. तसंच स्पर्धा पाकिस्तानशिवाय इतर कोणत्यातरी ठिकाणी घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली. आशिया कपमधील संघाचा विचार करता युएईमध्ये ही स्पर्धा घेतली जाऊ शकते.
भारत आणि पाकिस्तान देशांतील संबंध चांगले नसल्याने दोघेही एकमेंकाचा दौरा करत नाहीत. भारताचा विचार करता भारतीय संघ राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली 2005-06 मध्ये अखेरचा पाकिस्तानचा दौरा केला होता. 2012-13 मध्ये पाकिस्तान भारताच्या दौऱ्यावर आला होता, त्यानंतर जवळपास 10 वर्षे झाल्यानंतरही दोन्ही संघ एकमेंकाच्या भूमीवर क्रिकेट खेळलेले नाहीत. केवळ आयसीसी स्पर्धां आणि आशिया चषक स्पर्धेतच दोघेही एकमेंकाविरुद्ध आमने-सामने येतात. आता भारत-पाकिस्तान 23 ऑक्टोबर रोजी टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये आमने सामने येणार आहेत.
रॉजर बिन्नी 36 वे अध्यक्ष
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सुत्रे हाती घेतले. तसेच रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष ठरले आहेत. रॉजर बिन्नी यांच्याकडंच बीसीसीआयच्या अध्यक्षपदांची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. केवळ औपचारिकता म्हणून बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.
हे देखील वाचा-