Suryakumar Yadav : 'कुणी ना कुणी पुढे येऊन जबाबदारी घेतो, पण...', मालिका जिंकल्यावर कर्णधाराची मोठी कबुली; खराब फॉर्मवर काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या दणदणीत विजयाच्या आनंदात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतःच्या कामगिरीबाबत प्रामाणिक कबुली दिली आहे.

Suryakumar Yadav Ind vs Sa 5th T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या दणदणीत विजयाच्या आनंदात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वतःच्या कामगिरीबाबत प्रामाणिक कबुली दिली आहे. या मालिकेत आपल्याकडून धावा झाल्या नाहीत आणि कामगिरी पण काही खास राहिली नाही, हे त्याने मान्य केले. मात्र, लवकरच अधिक ताकदीनिशी पुनरागमन करणार असल्याचा विश्वासही सुर्याने व्यक्त केला. पाचव्या टी-20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी विजय मिळवला आणि मालिका 3-1 अशी खिशात घातली. यासह टीम इंडियाने सलग सातवी टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
स्वतःच्या कामगिरीवर नाराज कर्णधार ‘सूर्या’
सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “कदाचित या मालिकेत ‘सूर्या द बॅटर’ थोडासा गायबच होता. कुठेतरी तो मिसिंग वाटला.” पण, त्याने याकडे चिंतेचा विषय म्हणून न पाहता शिकण्याचा भाग म्हणून स्वीकारले. कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळताना संघाच्या गरजांना प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. “संघ चांगला खेळतोय. आमचा संघ चांगला खेळतोय. प्रत्येक सामन्यात कुणी ना कुणी खेळाडू पुढे येऊन जबाबदारी घेत आहे. अशा परिस्थितीत संघाचे वातावरण आणि प्लॅन योग्य दिशेने नेणे, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.” असे सूर्या म्हणाला.
चार डावांत फक्त 34 धावा
या मालिकेत सूर्यकुमार यादवचा बॅट पूर्णपणे अपेक्षेप्रमाणे चालला नाही. चार सामन्यांत त्यांनी एकूण फक्त 34 धावा केल्या असून, त्यांची धावसंख्या अनुक्रमे 12, 5, 12 आणि 5 अशी राहिली. तरीही आपल्या फॉर्मबाबत तो आशावादी आहेत. “मी स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखतो. मेहनत सुरूच आहे आणि ‘सूर्या द बॅटर’ नक्कीच परत येईल, तोही पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने...,” असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला.
क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असे टप्पे येतात, जेव्हा धावा निघत नाहीत, पण अशा वेळी संघाचा विजय हीच सर्वात मोठी समाधानाची बाब असते, असेही सूर्या म्हणाला. “संघ जिंकत असेल आणि इतर खेळाडू उत्तम कामगिरी करत असतील, तर एक फलंदाज म्हणून संयम राखणे गरजेचे असते,” असे सांगत त्यांनी आपल्या परिपक्व विचारांची झलक दाखवली.
2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी पुनरागमन आवश्यक...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर सूर्यकुमार यादववर बोटे उचलली जात आहेत, परंतु त्याने सांगितले की सूर्या द बॅटर जोरदार पुनरागमन करेल. भारताची पुढील टी-20 मालिका न्यूझीलंडविरुद्ध आहे. त्यानंतर होणाऱ्या टी-20 विश्वचषकात सूर्याला त्या मालिकेत पुनरागमन करावे लागेल आणि त्या बहु-राष्ट्रीय स्पर्धेत खराब कामगिरीचा टीम इंडियाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
हे ही वाचा -





















