Babar Azam: बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकला, अश्लिल व्हिडीओ अन् चॅट झालं व्हायरल
Babar Azam: सोशल मीडियावर याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काहींनी बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही केला आहे.

Babar Azam's private videos, sexting screenshots: पाकिस्तान संघाच्या खराब कामगिरीमुळे आणि स्वत:ही फ्लॉप होत असल्यामुळे बाबार आझम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. मायदेशात कसोटी आणि एकदिवसीय मालिका गमावल्यामुळे बाबर आझमवर पाकिस्तानमधील क्रीडा चाहत्यांनी टीका केली होती. बाबरच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरनेही बाबर आझमवर टीका केली होती. त्यातच आता बाबर आझमच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. एका महिलेबरोबर बोलतानाचा बाबर आझमचा खाजगी व्हिडीओ आणि स्क्रीन शॉट व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काहींनी बाबर आझम हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही केला आहे. दरम्यान हा व्हिडीओ आणि स्किनशॉट बनावट आहेत की ओरिजिनल हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी या लीक झालेल्या चॅटच्या आधारे बाबरवर गंभीर आरोप केले जात आहेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा अश्लिल व्हिडीओ आणि चॅट व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. eish. arajpoot या युजर्सनी बाबरसोबतचं चॅट आणि व्हिडीओ शेअर केले. त्यानंतर सोशल मीडियावर बाबरच्या व्हिडीओची आणि चॅटची चर्चा सुरु आहे. इन्स्टाग्रामशिवाय ट्वीटरवरही अनेकांनी बाबरचा खासगी व्हिडीओ आणि चॅट पोस्ट केले आहेत. ट्विटरवर अनेकांनी असा दावा केलाय की व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती बाबर आझम असून तो एका मुलीसोबत व्हिडिओ चॅट करताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला होता, जो eish.arajput1 अकाऊंटवरुन पोस्ट केल्याचं दिसतेय.
पाहा व्हायरल होणारे चॅट...
View this post on Instagram
Not a big babar fan but Dragging someone personal and private space just to degrade their image and get cheap attention is strongly condemnable unless he has really done a sin.🙂 pic.twitter.com/VT8L6qBaKh
— SaQib (@iam_SaQi9) January 16, 2023
What's happening in Babar Azam kingship? pic.twitter.com/9wG4VqaGmW
— See You (@Virtual_Vichar) January 15, 2023
Karachi Lobby is behind this #BabarAzam pic.twitter.com/m3dlWgUpZW
— Jasim Hussain (@jasimhussainn) January 15, 2023
Babar Azam sexting with gf of another Pakistan cricketer and promising her that her bf won’t be out of team if she keeps sexting with him is just 👎🏿
— INDIA wale (@Mahesh9999755) January 16, 2023
I hope allah is watching all this .#BabarAzam pic.twitter.com/diaClBTi6G
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. त्यातच पाकिस्तानच्या संघाची कामगिरीही अतिशय खराब झाली. मायदेशात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत दारुण पराभव झाला होता. यामुळे बाबर आझमच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. पाकिस्तानमधील क्रीडा चाहते बाबर टीका करत होते. काही चाहत्यांनी बाबरला सपोर्ट केला आहे. तर काही माजी क्रिकेटपटूंनी बाबरला कर्णधारपदावरुन काढायला हवं, त्याच्या खेळात सुधारणा होईल, असे मतही व्यक्त केलेय. अधीच अडचणीत असणारा बाबर आता नव्या अडचणीत सापडला आहे. बाबर आझमचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका मुलीसोबत व्हिडीओ चॅट करताना बाबर दिसत आहे. व्हिडीओमध्ये बाबर विचित्र अवस्थेत दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपल्याच सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत असे अश्लील कृत्य केले आहे. बाबरचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
