Virender Sehwag Birthday : विरेंद्र सेहवागने कुटुंबियांसोबत साजरा केला वाढदिवस, केक कापतानाचा व्हिडीओ शेअर केला 'कू'वर
विरेंद्र सेहवागने 'हॅपी बर्थडे टू मी, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद'. असे म्हणत केक कापतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Virender Sehwag Birthday : विरेंद्र सेहवागने 'हॅपी बर्थडे टू मी, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद'. असे म्हणत केक कापतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओवर चाहते विरेंद्रला शुभेच्छा देताना दिसून येत आहेत. विरेंद्रने त्याचा वाढदिवस त्याच्या घरच्यांसोबत साजरा केला आहे. विरेंद्र सेहवागला अनेक नामवंत क्रिकेटरदेखील शुभेच्छा देत आहेत.
विरेंद्र सेहवागने 43 व्या वर्षात पदापर्ण केले आहे. सध्या ते कॉमेंट्री करताना दिसून येतात. विरेंद्र सोशल मीडियावरदेखील खूप अॅक्टिव्ह आहे. सेहवागने हरियाणात त्याच्या क्रिकेट अॅकॅडमीची सुरुवात केली आहे. सेहवागला विश्वास आहे की, त्याची दोन्ही मुले क्रिकेटच्या क्षेत्रात विरेंद्रचे नाव मोठे करतील. विरेंद्रने त्याच्या मुलांना सांगितले आहे,"तुम्ही मैदानात जेव्हा 300 रन मारुन दाखवाल तेव्हा मी तुम्हाला हवी ती लक्झरी गाडी भेट देईल".
विरेंद्र सेहवागच्या वाढदिवसाचा केक त्याच्या धाकट्या मुलाने कापला आहे. 'कू' अॅपवर विरेंद्रने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विरेंद्रची आई, पत्नी आणि मुले दिसून येत आहेत. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांनी चांगलाच व्हायरल केला आहे. सेहवागचा मुलगा केक कापत असल्याने सेहवाग लांब उभं राहून मजा घेत होता. तेवढ्यात आजी म्हणाली,"असे बाबांचा वाढदिवस आहे तर त्यांना केक कापू दे".
Road Safety World Series 2021 : सचिन-सेहवाग जोडीची पुन्हा फटकेबाजी, India Legends चा धमाकेदार विजय
2004 सालच्या मुलतान येथील ऐतिहासिक पाकिस्तान कसोटी दौऱ्यावर सेहवागने त्रिशतक ठोकले होते. त्यामुळे तो कसोटीत त्रिशतक ठोकणारा पहिला आणि एकमेव फलंदाज ठरला आहे. सेहवागने सर्वात वेगवान कसोटी त्रिशतक करण्याचाही विक्रम आपल्या नावावर केला होता. तेव्हापासून त्याला ‘नजाफघरचा नवाब’ आणि ‘मुलतानचा सुलतान’ अशी टोपणनावे देण्यात आली. सेहवागला त्याच्या क्रिकेटमधील योगदानामुळे 2002 साली अर्जुन पुरस्कार तर 2010 साली पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सेहवागच्या नावावर अनेक विक्रम आहेत.