(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virender Sehwag on Kohli: '...तर, आज विराट कोहली संघात नसता' वीरेंद्र सेहवागचा मोठा खुलासा
Virender Sehwag on Kohli: सेहवाग आणि धोनीचा हा निर्णय कोहलीच्या कारकिर्दीत महत्त्वाचा ठरला आहे.
Virender Sehwag on Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जगभरातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहलीने आतापर्यंत अनेक विक्रमाला गवसणी घातलीय.जगातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांमध्ये त्याची गणना केली जातंय. मात्र, त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. विराट कोहलीनं वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केलं होतं. मात्र, विराट कोहलीनं 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत केवळ 76 धावा केल्या. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं. तसेच कोहलीचे स्थान पुन्हा एकदा धोक्यात आलं होतं. याबाबत वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) मोठा खुलासा केलाय.
दरम्यान, कोहलीने 2011 च्या वर्षा अखिरेस वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही त्याला संधी देण्यात आलं. परंतु, इतर फलंदाजांप्रमाणे त्यालाही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना खेळताना संघर्ष करावा लागला. या मालिकेतील तिसऱ्या कसोटीपूर्वी कोहलीचे स्थान पुन्हा एकदा धोक्यात आलं. मात्र, कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांनी कोहलीची पाठराखण केली. ज्यामुळे प्लेइंग 11 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला.
वीरेंद्र सेहवाग काय म्हणाला?
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2016 मध्ये खेळण्यात आलेल्या मालिकेत वीरेंद्र सेहवागनं समालोचन दरम्यान एक मनोरंजक किस्सा शेअर केला. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की, निवडकर्त्यांनी कोहलीला संघातून वगळायचं ठरवलं होतं. परंतु, मी आणि महेंद्रसिंह धोनीनं त्याची पाठराखण केली. 2012 च्या पर्थ कसोटीत कोहलीच्या ऐवजी रोहित शर्माचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करावा, असे निवडकर्त्यांना वाटत होतं. तेव्हा मी उपकर्णधार होतो आणि धोनी संघाचे नेतृत्व करत होता. आम्ही कोहलीला संघात ठेवण्याचा निर्णय घेतला.
सेहवाग आणि धोनीचा हा निर्णय कोहलीच्या कारकिर्दीत महत्त्वाचा ठरला आहे. यानंतर तो एकदाही संघातून वगळलेला नाही. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 44 तर दुसऱ्या डावात 75 धावा केल्या. हा सामना एक डाव आणि 37 धावांनी जिंकण्यात भारतीय संघाला यश आलं होतं.
हे देखील वाचा-
- #BreakingNews : 24 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर, Pakistan Cricket बोर्डाची माहिती
- Shoaib Akhtar in Trouble: लाईव्ह टीव्ही शो सोडणं शोएब अख्तरच्या अंगलट, पीटीव्ही चॅनेलनं ठोकला 10 कोटींचा दावा
- ICC T20 WC 2021, IND vs NAM Preview: भारत- नामिबिया आज आमने-सामने, दुबई आंतराष्ट्रीय स्टेडिअमवर रंगणार सामना