Asia Cup 2022 : आगामी आशिया कपसाठी (Asia Cup 2022) भारतीय संघ जाहीर झाला असून रोहित शर्मा कर्णधार, केएल राहुल उपकर्णधार असून विराट कोहलीही संघात आहे. खराब फॉर्ममुळे मागील काही काळ टीकाचा धनी झालेला विराट संघात असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची सर्वजण अपेक्षा करत आहेत. अशामध्ये विराट कोहली स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच एक अनोखा रेकॉर्ड नावे करणार आहे. विराटचा हा 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना असणार असून विशेष म्हणजे रोहित शर्मानंतर 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणारा तो पहिला भारतीय असेल.
अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई
विशेष म्हणजे विराटने आतापर्यंत 100 हून अधिक एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळले असल्याने आता तो 100 वा टी20 सामना खेळताच सर्व क्रिकेट प्रकारात 100 हून अधिक सामने खेळणारा दुसरा क्रिकेटपटू बनणार आहे. याआधी न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ही कामगिरी केली असल्याने विराट अशी कामगिरी करणारा पहिला आशियातील खेळाडू ठरणार आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
कसं आहे वेळापत्रक?
यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...
सामना | दिवस | दिनांक | संघ | ग्रुप | ठिकाण |
1 | शनिवार | 27 ऑगस्ट | अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका | बी | दुबई |
2 | रविवार | 28 ऑगस्ट | भारत विरुद्ध पाकिस्तान | ए | दुबई |
3 | मंगळवार | 30 ऑगस्ट | बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान | बी | शारजाह |
4 | बुधवार | 31 ऑगस्ट | भारत विरुद्ध पात्र संघ | ए | दुबई |
5 | गुरुवार | 1 सप्टेंबर | श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश | बी | दुबई |
6 | शुक्रवार | 2 सप्टेंबर | पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ | ए | शारजाह |
7 | शनिवार | 3 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | शारजाह |
8 | रविवार | 4 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
9 | मंगळवार | 6 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 | सुपर 4 | दुबई |
10 | बुधवार | 7 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
11 | गुरुवार | 8 सप्टेंबर | ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
12 | शुक्रवार | 9 सप्टेंबर | ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
13 | रविवार | 11 सप्टेंबर | सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 | सुपर 4 | दुबई |
हे देखील वाचा-