Shoaib Akhtar Video : जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड आजही ज्याच्या नावावर आहे, तो पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध शोएब अख्तर (Shoaib Akhtar) सध्या रुग्णालयात आहे. यावेळी शोएबने एक इमोशनल व्हिडीओ शेअर करत क्रिकेटमधून निवृत्तीमागील कारणही यावेळी सांगितलं आहे.
मागील बराच काळ गुडघ्याच्या समस्येने शोएब त्रस्त असल्याने त्याने त्यावर अनेकदा शस्त्रक्रिया देखील केली असून आताही एक शस्त्रक्रिया केल्यामुळे तो अॅडमिट आहे. तो सध्या ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथील रुग्णालयात भर्ती असून तिथूनच त्याने एक व्हिडीओ शेअर करत क्रिकेटमधून निवृत्तीमागील नेमकं कारण सांगितलं आहे.
शोएबने सांगितलं निवृत्तीमागील कारण
शोएबने व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की,"मी आणखी चार ते पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकलो असतो. पण मी असं केलं असतं तर माझी प्रकृती इतकी खराब झाली असती की मला व्हीलचेअरवर यावं लागलं असतं. त्यामुळेच मी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला." शोएब या व्हिडीमध्ये अगदी इमोशनल दिसत आहे. त्याने व्हिडीओत आपल्या चाहत्यांना त्याच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना देखील करायला सांगतिलं आहे.
पाहा व्हिडीओ-
अख्तरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
शोएभ अख्तरच्या नावावर 161 kph च्या वेगाने सर्वात वेगवान चेंडू फेकण्यासह अनेक आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड आहेत. त्याने पाकिस्तानसाठी 46 टेस्ट, 15 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 163 वन-डे सामने खेळले आहेत. या दरम्यान अख्तरने टेस्टमध्ये 178, वन-डेत 247 आणि टी-20 मध्ये 19 विकेट्स घेतले आहेत.
हे देखील वाचा-