Asia Cup :  आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेसाठी भारताने संघ जाहीर केला. यावेळी संघात मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह नसल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. दरम्यान बुमराहचं संघात नसण्यामागील नेमकं कारण हे म्हणजे दुखापत आहे.

बॅक इंजरीमुळे बुमराहला विश्रांती देण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली. तसंच बुमराह बंगळुरु येथे नॅशनल क्रिकेट अकादमी येथे उपचार घेत असल्याचंही बीसीसीआयने सांगितलं.

धवन-शमीही संघात नाही!

भारतीय संघाचा विचार करता यामध्ये काही दिग्गज खेळाडूंना डावलण्यात आलं आहे. ज्यामध्ये सलामीवीर शिखऱ धवन, गोलंदाज मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. शिखर मागील काही काळापासून फॉर्ममध्ये आहे. आयपीएलमध्येहील त्याने चांगली कामगिरी केली. पण तरीही त्याला सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळालं नाही. याशिवाय मोहम्मद शमीसारखा अनुभवी गोलंदाजही संघात नसल्याचं दिसून आलं आहे. बुमराह दुखापतीमुळे बाहेर असल्याने अनुभवी गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमारच संघात आहे. तसंच ईशान किशन, संजू सॅमसन या युवांनाही संधी मिळालेली नाही. दीपक हुडाला मात्र संघात स्थान मिळालं आहे.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान. 

राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल

कसं आहे वेळापत्रक?

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. यावेळी भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंति सामना पार पडणार असून नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...

सामना दिवस दिनांक संघ ग्रुप  ठिकाण 
1 शनिवार 27 ऑगस्ट अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका बी दुबई
2 रविवार 28 ऑगस्ट भारत विरुद्ध पाकिस्तान दुबई
3 मंगळवार 30 ऑगस्ट बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान  बी शारजाह
4 बुधवार 31 ऑगस्ट भारत विरुद्ध पात्र संघ दुबई
5 गुरुवार 1 सप्टेंबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  बी दुबई
6 शुक्रवार 2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध पात्र संघ शारजाह
7 शनिवार 3 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 शारजाह
8 रविवार 4 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
9 मंगळवार 6 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 1 सुपर 4 दुबई
10 बुधवार 7 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 2 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
11 गुरुवार 8 सप्टेंबर ग्रुप ए पात्र 1 विरुद्ध ग्रुप बी पात्र 2 सुपर 4 दुबई
12 शुक्रवार 9 सप्टेंबर ग्रुप बी पात्र 1 विरुद्ध ग्रुप ए पात्र 2 सुपर 4 दुबई
13 रविवार 11 सप्टेंबर सुपर 4 पात्र 1 विरुद्ध सुपर 4 पात्र 2 सुपर 4 दुबई

 

हे देखील वाचा-