Virat Kohli : विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत खेळणार! प्रत्येक सामन्यात मिळणार ‘इतका’ मोबदला…; पैसे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
Virat Kohli Vijay Hazare Trophy : विराट कोहलीने 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी अखेर हिरवा कंदील दाखवला आहे.

Virat Kohli play for Delhi in Vijay Hazare Trophy : विराट कोहलीने 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीत खेळण्यासाठी अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. कोहलीच्या या निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढला आहे. आणि वाढायलाच हवा… कारण तब्बल अनेक वर्षांनंतर विराट कोहली लिस्ट-ए घरगुती स्पर्धेत पुन्हा मैदानात उतरणार आहेत. अखेर विराट कोहलीनं या ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला कळवली आहे.
विराट कोहली एका एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख कमवतो....
विराट कोहलीने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो आता फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतो, जिथे तो प्रत्येक सामन्यासाठी 6 लाख कमवतो. पण, जेव्हा तो स्थानिक स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी 50 षटकांच्या स्वरूपात खेळतो, तेव्हा तो प्रत्येक सामन्यासाठी किती कमाई करेल?
विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचे वेळापत्रक...
विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याच्या घरच्या संघ दिल्लीकडून खेळेल. स्पर्धेतील दिल्लीचे वेळापत्रक पाहता, ते 24 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेश, 26 डिसेंबर रोजी गुजरात आणि 29 डिसेंबर रोजी सौराष्ट्र यांच्याशी सामना करतील. यानंतर, दिल्लीचा सामना 31 डिसेंबर रोजी ओडिशाशी होईल. 3 जानेवारी रोजी दिल्ली सर्व्हिसेसविरुद्ध खेळेल, तर 6 जानेवारी रोजी त्यांचा सामना रेल्वेशी होईल. 8 जानेवारी रोजी अंतिम सामन्यात दिल्लीचा सामना हरियाणाशी होईल.
🚨 BREAKING 🚨
— Cricbuzz (@cricbuzz) December 2, 2025
Virat Kohli is set to play in the Vijay Hazare Trophy. He has conveyed his availability for the Delhi team. pic.twitter.com/FGxrDGyHtk
विराट कोहली किती सामने खेळणार?
आता प्रश्न असा आहे की, विराट कोहली किती सामने खेळेल? तो संपूर्ण विजय हजारे ट्रॉफी खेळेल का? उत्तर नाही आहे. सूत्रांच्या मते, 2025-26 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये विराट कोहली फक्त तीन सामने खेळू शकतो. यामध्ये स्पर्धेतील पहिले दोन सामने आणि 6 जानेवारी रोजी रेल्वेविरुद्धचा सामना समाविष्ट असू शकतो.
विराटची मॅच फी 60000 रुपये....
विराट कोहली 2010 मध्ये पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे, जिथे तो प्रत्येक मॅचसाठी 60000 रुपये कमवू शकतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेल्या वरिष्ठ खेळाडूंइतकीच मॅच फी आहे. आता, जर विराट कोहलीने तीन सामने खेळले तर तो 1,80,000 रुपये कमवू शकतो.
हे ही वाचा -





















