एक्स्प्लोर

Video : ना फॅन्सची गर्दी, ना मीडियाचे कॅमेरे, इंग्लंडमध्ये विराट कोहलीची निवांत शॉपिंग

ENG vs IND : सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये असलेला भारताचा माजी कर्णधार विराट इंग्लंडमध्येच थोडं रिलॅक्स करताना दिसत आहे. तिथे निवात शॉपिंग करताना विराटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Virat Kohli Shopping in leicester : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) म्हटलं की जगातील अव्वल दर्जाचा क्रिकेटर. सध्या थोड्या खराब फॉर्ममध्ये असला तरी विराटची फॅन फोलीविंग काही कमी झालेली नाही. त्यामुळे भारतात कधी कुठे विराट दिसला तर त्याला पाहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची अगदी झुंबड उडते. पण विराट सध्या आगामी क्रिकेट दौऱ्यासाठी इंग्लंडमध्ये असून लीसेस्टर (leicester) येथे तो शॉपिंग करताना दिसून आला आहे.

विशेष म्हणजे ना बॉडीगार्ड ना चाहत्यांची गर्दी अशामध्ये निवांतपणे विराट यावेळी शॉपिंगचा आनंद घेत अगदी सामान्यांप्रमाणे दिसून आला. विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत त्यावर कमेंट्स देखील करत आहेत.

पाहा व्हिडीओ -

View this post on Instagram
 
A post shared by Shireen RamaKrishna Meher (@travelexplorergirl)

काही फॅन्सनी घेतले सेल्फी

विराटजवळ या ठिकाणी प्रचंड चाहत्यांची गर्दी झाली नसली तरी एक अव्वल दर्जाचा जागतिक क्रिकेटपटू असल्याने विराटला काही चाहत्यांनी नक्कीच ओळखत त्याच्यासोबत आवर्जून फोटो घेतला. विराटसोबतचे चाहत्यांचे फोटोही या व्हिडीओत दिसून आले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Rajeev kumar (@rj_viratsuperfan)

आयपीएलमध्ये विराटचं सुमार प्रदर्शन

यंदाच्या आयपीएल हंगामात (ipl 2022) विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 15 सामन्यात 22.73 च्या सरासरीने आणि 115.98 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात विराट कोहलीची सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73 असून तो तीन वेळा शून्य धावा करुनही बाद झाला आहे. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget