Virat Kohli Century : आता थांबायचं नाय... विराट कोहलीचं द. आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्यांदा शतक, 'किंग'कडून शतकांचा धमाका, रचला अनोखा पराक्रम
Virat Kohli Smashes 53rd ODI Century : किंग विराट कोहली एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला आहे.

Virat Kohli scores back-to-back centuries Ind vs Sa 2nd ODI : टीम इंडियाचा माजी कर्णधार किंग विराट कोहली एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला आहे. रांचीत पहिल्या सामन्यात रविवारी (30 डिसेंबर 2025) धुवांधार फटकेबाजी केल्यानंतर आता बुधवारी पुन्हा खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातही त्याने त्याच थाटात गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. आणि या मालिकेतील सलग दुसरे शतक ठोकले.
𝙐𝙣𝙨𝙩𝙤𝙥𝙥𝙖𝙗𝙡𝙚! 👑
— BCCI (@BCCI) December 3, 2025
BACK to BACK ODI HUNDREDS for Virat Kohli 🫡🫡
His 5⃣3⃣rd in ODIs 💯
Updates ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/sahZeIUo19
आता थांबायचं नाय... विराट कोहलीने ठोकले सलग दुसरे शतक! (Virat Kohli Smashes 53rd ODI Century)
कोहलीने 90 चेंडूत त्याचे 53 वे एकदिवसीय शतक झळकावले. हे त्याचे सलग दुसरे शतक आहे. पहिल्या सामन्यात त्याने 135 धावा केल्या होत्या. हा सलग तिसरा सामन्यात त्याचा 50+ स्कोर आहे. या दोन एकदिवसीय सामन्यांपूर्वी कोहलीने सिडनीमध्ये अर्धशतक झळकावले होते.
Back-to-back ODI hundreds for Virat Kohli 🔥#INDvSA 📝: https://t.co/b4ectUVL0T pic.twitter.com/mCNbrJGNOL
— ICC (@ICC) December 3, 2025
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाची झोप उडवली (Virat Kohli scores back-to-back centuries)
विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 11 वेळा शतके करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. सलग एकदिवसीय डावांमध्ये शतके ठोकण्याच्या यादीत विराटनंतर एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो, ज्याने सहा वेळा असे केले आहे. गेल्या तीन डावांमध्ये विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाची झोप उडवली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या मागील तीनही एकदिवसीय डावांमध्ये शतके ठोकली आहेत. यापूर्वी, त्याने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 101 धावा केल्या होत्या. त्याने चालू मालिकेतील दोन्ही डावांमध्ये शतकेही ठोकली आहेत.
Play it on loop ➿
— BCCI (@BCCI) December 3, 2025
Just like Virat Kohli 😎💯
Yet another masterful knock! 🫡
Updates ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/WYbSDLEQRo
102 धावा विराट कोहली OUT
विराट कोहली 102 धावांवर बाद झाला. कोहलीने 93 चेंडूत 102 धावा केल्या, त्यात 7 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने ऋतुराजसोबत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली. ऋतुराज 105 धावांवर बाद झाला.
हे ही वाचा -





















