रोहितने नाणेफेक जिंकली, भारतीय संघात पाच बदल, विराट-बुमराहला आराम, श्रेयसला स्थान नाहीच
India won the toss & decided to field first Asia Cup 2023 : भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने बांगलादेशविरोधात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Asia Cup 2023 : भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने बांगलादेशविरोधात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बांगलादेशविरोधात अखेरच्या साखळी सामन्यात टीम इंडियात पाच बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीसह बुमराह आणि सिराजलाही आराम देण्यात आला आहे. तिलक वर्माने आज पदार्पण केलेय.
भारतीय संघात पाच बदल -
आशिया चषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात रोहित शर्माने पाच खेळाडूंना आराम देण्यात आलाय. आशिया चषकात काही खेळाडूंना प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे बेंच स्ट्रेंथ तपासून पाहण्यासाठी प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना आराम देण्यात आलाय. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, मोहम्मद शामी, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दूल ठाकूर यांना प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेय.
श्रेयसला स्थान नाहीच -
विश्वचषकाचा भाग असणाऱ्या श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मागील दोन्ही सामन्यात उपलब्ध नव्हता. अय्यर याने दुखापतीवर मात केल्याचे वृत्त समोर आले होते. अय्यर याला बांगलादेशविरोधात स्थान मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आजही श्रेयस अय्यर याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळाले नाही.
BCCI confirms Shreyas Iyer has shown good improvement but he is not fully fit. [Sportstar] pic.twitter.com/9SS8bwTolj
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2023
तिलक वर्माचे पदार्पण -
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज आशिया चषकातील सुपर ४ मधील अखेरचा सामना होत आहे. या सामन्यात टीम इंडियात बदल करण्यात आलाय. मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मा याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलाय. तिलक वर्मा याने आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरोधात भारताच्या टी 20 संघात पदार्पण केले होते. या मालिकेत तिलक वर्माने सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर तिलक वर्माला आशिया चषकासाठी टीम इंडियाचे तिकिट मिळाले. तिलक वर्मा याने आज वनडेमध्ये पदार्पण केलेय.
Tilak, Shami, Prasidh, Surya, Thakur in.
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2023
Kohli, Bumrah, Siraj, Hardik, Kuldeep rested. pic.twitter.com/zlcGIw7t5C
टीम इंडियाचे शिलेदार -
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज