एक्स्प्लोर

Virat Kohli Record : वर्ल्डकप फायनलमध्ये अर्धशतक; कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम

Virat Kohli Record : अनेक विक्रम नोंदवणाऱ्या विराट कोहलीने आज फायनलमध्ये अर्धशतकी खेळी साकारत एक विक्रम आपल्या नावावर नोंदवला.

ICC World Cup 2023 Final आयसीसी वर्ल्डकप  2023 च्या फायनल मॅचमध्ये विराट कोहलीने (Virat Kohli) झुंजार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह  विराट कोहलीने आणखी विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. क्रिकेट वर्ल्डकपच्या (Cricket World Cup 2023) उपांत्य (Semi Final) आणि अंतिम (CWC Final) सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटचा कोहलीचा समावेश झाला आहे. 

विराट कोहली अशी कामगिरी करणारा जगातील सातवा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी 1979 साली इंग्लंडचा मायकेल ब्रेअरली, 1987 साली ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून, 1992 साली पाकिस्तानचा जावेद मियांदाद, 1996 साली श्रीलंकेचा अरविंद डी सिल्वा, 2015 साली न्यूझीलंडचा ग्रँट इलियट, 2015 साली ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या खेळाडूंनी उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 पेक्षा जास्त धावांची खेळी साकारली. यावेळी 2023 च्या विश्वचषकात विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपळली.

 यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीचा जलवा

या विश्वचषकात किंग कोहलीची बॅट चांगलीच तळपळली.  उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला आणि एकदिवसीय सामन्यात 50 शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला. याशिवाय त्याने या विश्वचषकात सर्वाधिक धावाही केल्या. त्याच्या खात्यात 765 धावा जमा झाल्या आहेत. मात्र, आज कोहली अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 63 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. या अर्धशतकासह विराट कोहली विश्वचषकाच्या इतिहासात एकाच स्पर्धेत 750 हून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. हादेखील एक विक्रमच आहे. 

दरम्यान,  वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही.  भारताने आपला पहिला गडी 30 धावांवर शुभमन गिलच्या रुपाने गमावला. तर, 76 धावा स्कोअर बोर्डवर लागल्या असताना रोहित शर्मा तंबूत परतला. श्रेयस अय्यरही वैयक्तिक 4 धावांवर बाद झाला. विराट कोहली एका बाजूने झुंज देत उभा होता. अर्धशतक झाल्यानंतर विराट कमनशिबी ठरला. कमिन्सच्या गोलंदाजीवर बॅटची कड घेवून चेंडू स्टम्पंवर आदळला आणि त्रिफळाचित झाला. 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
Embed widget