एक्स्प्लोर

Virat Kohli : विराट कोहलीची चहल-जाडेजाच्या बोलिंगवर जबरदस्त बॅटिंग, नेट्समध्ये कसून सराव, पाहा VIDEO 

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 साठी भारतीय संघ सज्ज झाला असून अनेकजणांच्या नजरा या विराट कोहली याच्यावर आहेत, त्यामुळेच कोहली देखील स्पर्धेपूर्वी कसून सराव करताना दिसत आहे. 

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याने स्पर्धेची सुरुवात करणार आहे. यावेळी भारतीय संघाचा (Team India) विचार करता सर्वाधिक नजरा या विराट कोहली वर असणार आहेत. याचं कारण मागील बऱ्याच काळापासून तो खास फॉर्ममध्ये नाही, त्यात आता तो विश्रांतीनंतर संघात परतत असून पाकिस्तानविरुद्ध त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. त्यामुळेच सर्वांच्या नजरा त्याच्यावर टिकून आहेत. यामुळे विराटही सामन्यांपूर्वी कसून सराव करताना दिसत आहे. तो भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर धमाकेदार फलंदाजी करत असल्याचं एका व्हिडीओतून समोर आलं आहे. ट्वीटरवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून कोहली चाहते कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 

पाहा व्हिडीओ - 

कोहली काही काळाच्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानात परतणार आहे. कोहलीने भारताकडून पाकिस्तानविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केल्या असून आता पाकिस्ताविरुद्धच तो मैदानात उतरणार असल्याने त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. विराट गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. पण आता तो पुन्हा फॉर्ममध्ये परतेल अशी अपेक्षा अनेकजण करत आहेत. 

विराट कोहलीची खराब फॉर्मशी झुंज

विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करावा लागत आहे. या कालावधीत विराट कोहलीला एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहली 20-30 धांवाचा टप्पा गाठण्यासाठी संर्घष करताना दिसत आहे. विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं. 

विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Pak Rising Stars Asia Cup 2026 : वैभव सूर्यवंशी पुन्हा पाकिस्तानला धू धू धुणार, अभिषेक, तिलकही संघात; BCCIने जाहीर केली Ind vs Pak सामन्याची तारीख!
वैभव सूर्यवंशी पुन्हा पाकिस्तानला धू धू धुणार, अभिषेक, तिलकही संघात; BCCIने जाहीर केली Ind vs Pak सामन्याची तारीख!
Team India A squad News : कर्णधार तिलक, उपकर्णधार पाटीदार! अभिषेक, रिंकू, वैभव सूर्यवंशीलाही संधी, BCCIने जाहीर केला 15 जणांची तगडा Squad, कधी उतरणार मैदानात?
कर्णधार तिलक, उपकर्णधार पाटीदार! अभिषेक, रिंकू, वैभव सूर्यवंशीलाही संधी, BCCIने जाहीर केला 15 जणांची तगडा Squad, कधी उतरणार मैदानात?
Glenn Maxwell Announces Retirement : तीन विश्वचषक जिंकले, वानखेडेवर अशक्य ते शक्य केलं... अखेर 'द बिग शो'च्या 14 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम! ग्लेन मॅक्सवेलचा धक्कादायक निर्णय
तीन विश्वचषक जिंकले, वानखेडेवर अशक्य ते शक्य केलं... अखेर 'द बिग शो'च्या 14 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम! ग्लेन मॅक्सवेलचा धक्कादायक निर्णय
IND vs NZ 1st ODI Playing XI : ऋतुराज गायकवाड, इशान किशन OUT; तर... न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
ऋतुराज गायकवाड, इशान किशन OUT; तर... न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या ODI सामन्यात अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Payal Pawar Zhambre Death Case Pune: दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
दुष्काळ सुरुय, थोडा वेळ द्या ना..., पायलच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं?, पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
Sangli News: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी सुरू; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, गोपीचंद पडळकरांसह 'हे' नेते रिंगणात
NCP Crisis Parth Pawar: अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
अमित शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची मोठी मागणी, पार्थ पवारांबाबत नाराजी, आता संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर काय घडणार?
Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
Maharashtra Live blog updates: सातारा, सांगली जिल्हा बँकांच्या मतमोजणीला सुरुवात; दिग्गजांच्या प्रतिष्ठा पणाला
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकाऊंटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
Embed widget