एक्स्प्लोर

Virat Kohli Record : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीला 'हा' विक्रम करण्याची संधी

कर्णधार कोहलीने आतापर्यंत क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 438 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 22937 धावा केल्या आहेत.

Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना लीड्समध्ये खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला एक अनोखा विक्रम नोंदवण्याची सुवर्णसंधी आहे. जर कोहलीने या सामन्यात 63 धावा केल्या तर त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23000 धावा पूर्ण होतील. आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात फक्त 6 फलंदाज आहेत ज्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 23000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.

कर्णधार कोहलीने आतापर्यंत क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 438 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 22937 धावा केल्या आहेत. तो 23000 धावांचा टप्पा गाठण्याच्या अगदी जवळ आहे. पुढील सामन्यात तो हा विक्रम आपल्या नावे करेल अशी अपेक्षा आहे. जर त्याने पुढील सामन्यात 63 धावा केल्या तर तो 23000 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा जगातील 7 वा फलंदाज बनेल. याशिवाय, असे करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. आतापर्यंत सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी भारतासाठी हा विक्रम केला आहे.

सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर अव्वल आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत एकूण 664 सामने खेळले, ज्यात त्याने 34357 धावा केल्या. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावण्याचा पराक्रमही केला आहे. सर्वाधिक धावांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. संगकाराने 28016 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 27483 धावांसह ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा महेला जयवर्धने आहे, त्याने 25957 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस 25534 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर राहुल द्रविड 24208 धावांसह या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. सध्या विराट कोहली सातव्या स्थानावर आहे.

विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये

विराट कोहली बऱ्याच काळापासून चांगल्या फॉर्ममध्ये नाही आणि याच कारणामुळे नोव्हेंबर 2019 नंतर त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नाही. टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर असली तरी विराट कोहलीचा फॉर्म नसणे ही चिंतेची बाब आहे. मात्र, विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सोमवारी आशा व्यक्त केली होती की कोहली लवकरच शतक ठोकेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोपAnjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानियाABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Embed widget