एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्मानं बॉलिंगचा सराव केला अन् फलंदाज बनला, प्रशिक्षक दिनेश लाड यांनी गुपित सांगितलं

Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद पटकावलं होतं. आता प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहित शर्माकडून काय अपेक्षा आहेत ते सांगितलं आहे.

मुंबई :  टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकून भारताने (Team India) विश्वचषकावर आपले नाव कोरले. विश्वचषक जिंकून जवळपास महिना होत आला तरी देखील मुंबईकरांचा क्रिकेटचा फीवर अजूनही कमी झाला नाही. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ज्या शाळेत शिकला त्या शाळेत एका महिलेकडून एक कार T-20 वर्ल्ड कपच्या फोटोंचा वापर करुन सजवून आणण्यात आली होती. ज्यावर भारतीय संघाचे सर्व खेळाडू विश्वचषक घेताना दाखवण्यात आले होते. रोहित शर्माच्या शाळेत कार आणण्यात आली त्या यावेळी विद्यार्थ्यांकडून रोहित शर्माच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. हिटमॅनचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad)यांनी यावेळी रोहित शर्माकडून काय अपेक्षा आहेत हे सांगितलं. 

मीना शहा यांनी टीम इंडियानं टी 20 वर्ल्ड कप जिंकला त्यावेळच्या फोटोंचा वापर करुन कार सजवली होती. टी 20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची प्रतिकृती देखील त्या कारवर लावण्यात आली होती. यावेळी रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. रोहित शर्मानं देशाला आनंद दिला. देशातील कोट्यवधी जनतेला आनंद दिला, असंही दिनेश लाड म्हणाले. 

रोहित शर्मानं भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आणि 2027 चा 50 षटकांचा विश्वचषक जिंकून द्यावा, अशी आशा व्यक्त केली. यासाठी कालच पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला साकडं घातल्याचं दिनेश लाड म्हणाले. टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानं आपल्या देशाला आनंद मिळाला, 130 कोटी जनतेला रोहितनं आनंद दिला, असं दिनेश लाड म्हणाले. रोहित शर्मा आमच्या  शाळेत शिकला, बाराव्या वर्षी शाळेत आला,शिकला मोठा झाला त्यामुळं बरं वाटलं, असं दिनेश लाड म्हणाला. दिनेश लाड यांनी यापुढं या शाळेत आल्यानंतर रोहित शर्मानं बॉलिंगचे धडे घेतले अन् तो बॅटसमन झाला, असं म्हटलं 

रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिका खेळणार?

रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारताची पहिलीच मालिका असल्यानं रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंची उपस्थिती महत्त्वाची ठरते. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताचे वनडे सामने कमी असल्यानं रोहित शर्मा या मालिकेत खेळणार असल्याची माहिती आहे. रोहित शर्माकडे भारताच्या वनडे संघाचं कॅप्टनपद आहे. तर, टी 20 मालिकेत कोण भारताचा कॅप्टन कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या : 

Team India: हार्दिक पांड्या की सूर्यकुमार यादव, टी 20 मध्ये भारताचा कॅप्टन कोण होणार? आकडेवारी नेमकी कुणाच्या बाजूनं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget