एक्स्प्लोर

IND vs SL : लाहिरु कुमाराने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर बाद केलं विराटला, बोल्डचा व्हिडीओ पाहण्यासारखा, पाहा VIDEO

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली केवळ 4 धावा करुन बाद झाला.

IND vs SL : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची (Team India) सुरुवात चांगली झाली नाही. प्रथम गोलंदाजी करताना टीम इंडियाने प्रतिस्पर्धी श्रीलंका संघाला 39.4 षटकांत 215 धावांत ऑलआउट केले. पण त्यानंतर फलंदाजीला उतरताना टीम इंडियाची टॉप ऑर्डर झटपट पॅव्हेलियनमध्ये परतली. यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीचाही (Virat Kohli) सहभाग होता. या सामन्यात कोहलीला केवळ 4 धावा करता आल्या. त्याला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लाहिरू कुमाराने (Lahiru Kumara) उत्कृष्ट गोलंदाजी करत बोल्ड केले.

असा बोल्ड झाला कोहली, पाहा VIDEO

विराट कोहलीचा बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की लाहिरू कुमाराने विराट कोहलीला कशाप्रकारे अप्रतिम चेंडू फेकत बाद केलं. कुमाराने फेकलेला चेंडू कोहलीच्या बॅटच्या आतीलकडेला लागून थेट स्टंपकडे गेला. कोहलीला हा चेंडू अजिबात समजू शकला नाही. बाद झाल्यानंतर विराट कोहलीची प्रतिक्रिया अशी होती की त्याला चेंडू अजिबात समजला नाही. चेंडू त्याच्या बॅटला आदळल्यानंतर ऑफ स्टंपला लागला. कोहलीला बाद केल्यानंतर लाहिरू कुमाराने देखील या विकेटचं सेलिब्रेशन जल्लोषात केलं.
गेल्या सामन्यात शतक झळकावले

पहिल्या सामन्यात झळकावलं होतं शतक

मालिकेत याआधी झालेल्या गुवाहाटी येथील एकदिवसीय सामन्यामध्ये विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं. त्या सामन्यात त्याने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक होते. ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण यावेळी तो चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही. या सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त 1 चौकार आला.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

ENG vs PAK :  इंग्लंडनं पाकिस्तानचा धुव्वा उडवला, पाकचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि 103 धावांनी पराभव, लीडसवर पाकचा पुन्हा पराभव
इंग्लंडकडून पाकिस्तानचा धुव्वा, पहिल्या कसोटीत 103 धावा आणि डावानं विजय, 8 वर्षानंतर पाकचा पुन्हा तसाच पराभव
WTC Final: टीम इंडियाला 8 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवताच WTC फायनलचं दार उघण्याची संधी, एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता
भारताकडे WTC फायनलमध्ये पोहोचण्याची संधी पण एका गोष्टीमुळं घात होण्याची शक्यता, जाणून घ्या
ODI Cricket Record : वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
वनडे क्रिकेटमध्ये 'झिरो'वर आऊट न झालेले दिग्गज खेळाडू; लिस्टमध्ये भारतीय स्टारचाही समावेश!
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget