विराटनं सांगितलं, सिराजनं फॉलो केलं, दोघांनी असं जाळं टाकलं की स्टिव्ह स्मिथ पुरता अडकला, 'त्या' प्लॅनिंगची इनसाईड स्टोरी!
सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे. याच मालिकेतील विराट आणि सिराजच्या प्लॅनिंगची सगळीकडे चर्चा होत आहे.
Ind vs Aus Border-Gavaskar Trophy : सध्या मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात पाच सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना सध्या चौथा सामना चालू आहे. हा सामना चांगलाच चुरशीचा ठरत आहे. कारण एकमेकांना हरवण्यासाठी दोन्ही संघाचे खेळाडू चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय. दरम्यान, याच सामन्यातील विराट आणि मोहम्मद सिराज यांच्या एका प्लॅनिंगची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांच्या या प्लॅनिंगमुळे ऑस्ट्रिलायाचा स्टिव्ह स्मिथ थेट बाद झाला आहे.
अनोख्या प्लॅनिंगची सगळीकडे चर्चा
ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ एक मुरलेला आणि कसलेला खेळाडून म्हणून ओळखला जातो. संघ संकटात असताना एकट्याच्या हिमतीवर विजय खेचून आणण्याची त्याच्यात ताकद आहे. त्यामुळेच त्याला बाद करणं फार गरजेचं होतं. विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांनी मात्र याच स्टिव्ह स्मिथला बाद करण्यासाठी चांगलंच प्लॅनिंग केलं. त्यांच्या या अनोख्या प्लॅनिंगची सगळीकडे चर्चा होत आहे.
स्टिव्ह स्मिथला आऊट करण्यासाठी नेमकं काय प्लॅनिंग केलं?
स्टिव्ह स्मिथला लवकरात लवकर बाद करणं भारतासाठी गरजेचं होतं. मात्र तो मैदानावर पाय रोवून होता. विराट कोहलीला मात्र स्टिव्ह स्मिथची कमकुवत बाजू माहिती होती. मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी आला असताना विराट कोहलीने सिराजला प्रत्येक चेंडू विकेटपासून दूर टाकण्याचा सल्ला दिला. 'विकेट के कोनेसे' असं विराटने सिराजला मैदानावरच सांगितलं. सिराजनेही हे लक्षात ठेवून तसाच चेंडू स्टम्पसपासून दूर टाकला. या चेंडूवर स्टिव्ह स्मिथ गोंधळला आणि चेंडू थेट यष्टीरक्षाकाच्या हातात विसावला.
View this post on Instagram
अवघ्या 13 धावांवर स्टिव्ह स्मिथ बाद
परिणामी स्टिव्ह स्मिथ अवघ्या 13 धावांवर बाद झाला. स्टिव्ह स्मिथने एकूण 41 चेंडू खेळले. यात त्याने फक्त एक चौकार लगावला. विराट आणि सिराजचे हे प्लॅनिंग टीम इंडियाच्या चांगलेच कामी आले. दरम्यान, सध्याच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडून एकमेकांना चांगलेच भिडताना दिसत आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये मोठे वाद होताना दिसत आहेत.
हेही वाचा :