Virat Kohli 100th Test : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी 04 मार्च रोजी श्रीलंका संघाविरुद्ध मोहाली येथील मैदानात 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी आता प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली असून एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट केलं आहे.


गांगुलीने दिलेल्या माहितीनुसार पंजाब क्रिकेट असोसिएशन (PCA) सरकारी नियमांप्रमाणे विराट कोहलीच्या 100 व्या मोहाली येथील कसोटीला प्रेक्षकांना परवाणगी देणार आहे. दरम्यान गांगुलीने पीसीए अध्यक्ष राजींदर गुप्ता यांच्याशी बोलल्यानंतर या कसोटीदरम्यान उपस्थित प्रेक्षक संख्येवर कोणतेही निर्बंध नसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 



100 व्या कसोटीत कोहली शतक झळकावणार?


किंग कोहलीने आतापर्यंत 99 कसोटी सामने खेळले असून त्याच्या यावेळी त्याने 50.39 च्या शानदार सरासरीने 7 हजार 962 रन केले आहेत. दरम्यान मागील बऱ्याच काळापासून त्याने एकही शतक ठोकलेलं नाही. नोव्हेंबर, 2019 मध्ये त्याने बांग्लादेशविरुद्ध अखेरचं शतक झळकावलं होतं. दरम्यान त्याच्या या 100 व्या कसोटीत तो शतक झळकावणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.


टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार


विराटने नुकतंच कसोटी कर्णधारपद सोडलं असून विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने 65 सामन्यातील 38 सामन्यांत विजय मिळवला आहे. जगात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत दक्षिण आफ्रीकेचा ग्रीम स्मिथ (53), ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉटिंग (48) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ (41) कोहलीपुढे आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha